(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Randeep Hooda : सावरकरांसाठी रणदीप हु्ड्डाचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहतेही अवाक्!फोटो पाहून अंगावर येईल काटा
Randeep Hooda : स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटासाठी रणदीप हुड्डाने 30 किलो वजन कमी केल्याचं सांगितलं होतं. तसेच हा सिनेमा बनवण्यासाठी मी घरं देखील विकलं असल्याचं रणदीपने सांगितलं.
Randeep Hooda : रणदीप हुड्डा (Randeep Hooda) दिग्दर्शित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swantantra Veer Savarkar) हा चित्रपट येत्या 22 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डा याने स्वातंत्र्यवीर सावकरांची भूमिका साकारली आहे. दरम्यान नुकतच रणदीपने माझा कट्टावर झालेल्या मुलाखतीत या भूमिकेसाठी घेतलेल्या मेहनतीविषयी सांगितलं. तसेच त्याने त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुनही त्याचा हा फोटो शेअर केलाय.
स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटासाठी रणदीप हुड्डाने 30 किलो वजन कमी केल्याचं सांगितलं होतं. तसेच हा सिनेमा बनवण्यासाठी मी घरं देखील विकलं असल्याचं रणदीपने सांगितलं. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनचा प्रोपागांडा असल्याचं म्हटलं जात आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी अभिनेते प्रचंड मेहनत घेत असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच रणदीपने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो सध्या प्रचंड व्हायरल होतोय.
रणदीप हुड्डाचा पोस्ट चर्चेत
स्वातंत्र्यवीर सावकर या चित्रपटाच्या वेळेचा एक फोटो रणदीपने यावेळी शेअर केलाय. तसेच त्याने या फोटो काला पानी असं कॅप्शन दिलंय. त्याच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स करत त्याच्या मेहनतीचं देखील कौतुक केलंय. एका कमेंट करत म्हटलं की, असा अभिनेता हवा. आणखी एका युजरने कमेंट करत म्हटलं की, प्रत्येक भूमिकेसाठी त्याचं सर्व काही देतोय. तर एकाने कमेंट करत त्याला थेट राष्ट्रीय पुरस्कारांची तयारी कर असं म्हटलं आहे.
रणदीपने 30 किलो वजन कसं कमी केलं?
View this post on Instagram
वजन कमी करण्याबद्दल रणदीप म्हणतो,"माझी बहिन न्यूट्रिशन स्पेशलिस्ट आहे. तिने सांगितलेल्या गोष्टी मी फॉलो केल्या. 16 ते 20 तास मी काही खास नसे. फक्त पाणी प्यायचो. ब्लॅक कॉफी, ग्रीन टी या गोष्टींचे सेवन करत असे. 16 तासांपेक्षा अधिक काळ तुम्ही उपवास ठेवता तेव्हा तुमचं शरीर स्वत: ते रिपेअर करू लागतं. आठवड्यातून 1-2 दिवस प्रत्येकाने उपवास ठेवायला हवा. त्यामुळे तुमचं शरीर रिसेट होईल. ऑमलेट, ड्रायफ्रूट या गोष्टी मी खात असे. एक चमचा नारळाचं तेळ, बदामाचं तूप आणि दोन काजू असा डाएट मी फॉलो केला आहे."