एक्स्प्लोर
माफी मागा किंवा परिणामांना सामोरं जा, आव्हाडांचा वर्मांना इशारा
मुंबई : एकीकडे जागतिक महिला दिन साजरा होत असताना दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये ट्विटरयुद्ध पेटलं होतं. अभिनेत्री सनी लिओनचा संदर्भ देत आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या राम गोपाल वर्मांना आव्हाडांनी माफी मागण्याचा इशारा दिला आहे.
'सनी लिओन जितका आनंद देते, तितकाच आनंद जगभरातील सर्व महिलांनी पुरुषांना द्यावा, अशी इच्छा आहे' असं ट्वीट राम गोपाल वर्मांनी केलं होतं. त्यावर आक्षेप घेत राम गोपाल वर्मांनी माफी मागावी, किंवा परिणामांना सामोरं जावं, कायदा हातात घेण्याचीही आमची तयारी आहे, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला.
यावर 'उत्तम, लोकशाही देशात कायदा हातात घेण्याची धमकी दिल्याबद्दल शरद पवार यांनी तुम्हाला हाकलून द्यायला हवं. तुम्ही पवारांच्या विचारधारेला कलंक आहात.' असं शेलकं उत्तर राम गोपाल वर्मांनी दिलं. 'तुमचा पत्ता द्या आणि बघा. तुम्हाला आई नाही का' असं ट्वीट आव्हाडांनी केलं.
'कायदा हाती घेण्याची धमकी दिल्याबद्दल माफी न मागितल्यास मी रितसर तक्रार दाखल करेन. काय करु ते सांगा' असा सवाल वर्मांनी केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून आव्हाडांनी 'आगे बढो' इतकंच ट्वीट केलं.
राम गोपाल वर्मांचं महिला दिनी वादग्रस्त ट्वीट
राम गोपाल वर्मांच्या ट्वीटवर सनी लिओनने मात्र स्माईली टाकत हसण्यावारी घेतलं. अशिक्षित लोकांनी माझ्या ट्वीटचा चुकीचा अर्थ काढल्याचं राम गोपाल वर्मा यांनी म्हटलं आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement