Rakhi Sawant Mother Death: राखी सावंतच्या आईचं निधन, जुहूच्या क्रिटि केअर हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास
Rakhi Sawant Mother Death: राखीची आई गेली तीन वर्षे कर्करोगाशी लढा देत होती. मुंबईत राखीच्या आईवर उपचार सुरू होते. अखेर कर्करोगाशी त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली.
Rakhi Sawant Mother Jaya Death: बॉलीवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध मॉडेल राखी सावंतच्या आईचं (Rakhi Sawant Mothr) निधन झाले आहे. जुहूच्या क्रिटि केअर हॉस्पिटलमध्ये राखी सावंतच्या आईने अखेरचा श्वास घेतलाय. राखी सावंतची आई जया भेडा या गेल्या तीन वर्षांपासून कॅन्सर आजाराशी लढा देत होत्या. मात्र अखेर त्यांचा हा लढा अपयशी ठरलाय. या महिन्याच्या सुरुवातीला राखीच्या आईला ब्रेन ट्यूमर झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं.
आईच्या निधनामुळे राखीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. राखी सावंतने स्वत: आईच्या निधनाची माहिती दिली. राखी म्हणाली, आई आता या जगात नाही. आईचे मल्टिपल ऑर्गन फेल झाल्याने निधन झाले आहे. आईची स्थिती अत्यंत नाजूक होती. निधनाच्या वेळी राखी आईसोबत होती.
राखी सावंतने जानेवारी महिन्यात आईला ब्रेन ट्युमर झाल्याची माहिती दिली होती. तसेच आईसाठी प्रार्थना करण्याचे देखील आवाहन राखीने केले होते. 2021 साली राखीच्या आईचे कर्करोगाचे ऑपरेशन देखील झाले होते. सलमान आणि सोहेल खानने उपचारासाठी मदत केली होती. आईच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी राखी रात्रंदिवस देवाकडे प्रार्थना करत होती. तिने मुंबईतील एका एनजीओला (NGO) भेट देखील दिली होती.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी झाला विवाह
राखी सावंतचा काही दिवसांपूर्वी आदिल दुर्रानीशी विवाह झाला. राखीनं आदिल दुर्रानीसोबतचे (Adil Durrani) काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत लग्नाची माहिती चाहत्यांना दिली. सुरवातील आदिलने लग्नाच्या बातमीला नकार दिला होता. नंतर आदिलने स्वत: ही माहिती दिली. आदिलनं सांगितलं, राखी आणि माझं लग्न झालं आहे. आम्ही एकत्र राहत आहोत आणि आनंदी आहोत.
आदिल खान हा बंगळुरुमध्ये राहत होता. त्याचा कारचा व्यवसाय आहे. राखीचे आदिलसोबतचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बिग बॉस या शोमुळे राखीला लोकप्रियता मिळाली. राखी तिच्या विनोदी वक्यव्यामुळे चर्चेत असते.
संबंधित बातम्या :