Rakhi Sawant : राखी सावंत कधीच आई होऊ शकत नाही : आदिल खान दुर्रानी
Rakhi Sawant : राखी सावंत कधीच आई होऊ शकत नाही, असा दावा आदिल खान दुर्रानीने (Adil Khan Durrani) केला आहे.
![Rakhi Sawant : राखी सावंत कधीच आई होऊ शकत नाही : आदिल खान दुर्रानी Rakhi Sawant Adil Khan Durrani Allegations On Rakhi Sawant adil khan durrani made serious allegations on rakhi sawant said she drugged me and shoot my nude video watch video Adil Khan Durrani Slams Rakhi Sawant's Miscarriage Allegations Says Had To Get Her Uterus Removed Rakhi Sawant : राखी सावंत कधीच आई होऊ शकत नाही : आदिल खान दुर्रानी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/22/2f73981d4e7af2ae1694bae2a4627f041692681767525254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Adil Khan Durrani Allegations On Rakhi Sawant : बॉलिवूडची 'ड्रामाक्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) चर्चेत नाही असा एकही दिवस जात नाही. वादग्रस्त वक्तव्यासह वैयक्तिक आयुष्यामुळे ती अनेकदा चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या पतीवर अर्थात आदिल खान दुर्रानीवर (Adil Khan Durrani) गंभीर आरोप केले होते. तसेच तिने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे आदिल गेल्या सहा महिन्यांपासून तुरुंगात होता. आता त्याची सुटका झाली असून त्याने 'ड्रामा क्वीन' विरोधात गंभीर आरोप आणि खळबळजणक दावे केले आहेत.
आदिल खान दुर्रानीने बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत राखी सावंत विरोधात गंभीर आरोप केले आहेत. आदिल म्हणाला,"मला खूप त्रास झाला आहे. पण हा त्रास मी कोणासोबत शेअर करू शकत नाही. राखीने मला फसवलं आहे..छळ केला आहे. माझ्याकडून दीड कोटी रुपये घेतल्याचे सांगत तिने मला फसवलं आहे. तिने माझ्यावर फसवणूक आणि विवाहबाह्य संबंधनाचा आरोपही केला आहे".
View this post on Instagram
आदिल खान पुढे म्हणाला,"राखी सावंत माझ्यापेक्षा 19 वर्षांनी मोठी आहे. पण ती माझ्यापेक्षा फक्त सात वर्षांनी मोठी असल्याचा दावा तिने अनेकदा केला आहे. तसेच तिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चेत काहीही सत्य नाही. ती अविवाहित असल्याचं तिने मला खोटं सांगितलं होतं. मिसकॅरेज झाल्याचं तिने मीडियाला खोटं सांगितलं आहे. गर्भाशयासंबंधित तिला काहीतरी समस्या आहे त्यामुळे तिचं गर्भाशय काढून टाकलं आहे. ती कधीही आई होऊ शकत नाही. राखी मला ड्रग्ड देऊन माझे न्यूड व्हिडीओ बनवत असे".
आदिलने राखीला दिलेली धमकी (Adil Khan Durrani threatened Rakhi Sawant)
राखी सावंतने गेल्या काही दिवसांपूर्वी आदिलची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान आदिल खान तिला म्हणालेला,"आज मी तुरुंगात आहे. यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते. आर्थर रोड तुरुंगासारखं घाणेरडं तुरुंग मी आजवर पाहिलेलं नाही. इथे मी भांडी घासली आहेत. लोकांसाठी चहा बनवला आहे. त्यांचे पाय चेपून दिले आहेत. मला मारहाणही झाली आहे. यासर्व गोष्टींचा बदला घ्यायला मी पुन्हा येईन. लवकरच माझी सुटका होईल. मग बघ तुझं काय होईल". मारहाण, फसवणूक आणि लैंगिक अत्याचार करायचा, असा आरोपही राखी सावंतने आदिलवर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)