(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rakhi Sawant Health Updates : रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राखी सावंतने स्वत: दिली हेल्थ अपडेट, म्हणाली गर्भाशयात गाठ आता...
Rakhi Sawant Health Updates : ड्रामा क्वीन अचानक रुग्णालयात दाखल झाल्याने चाहत्यांना धक्का बसला. अनेकांनी ती पुन्हा एकदा काहीतरी नौटंकी करत असावी असा कयास बांधला. आता राखीने स्वतःच्या तब्येतीबद्दल अपडेट दिली आहे.
Rakhi Sawant Health Updates : राखी सावंत (Rakhi Sawant) गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात आहे. छातीत तीव्र वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर मंगळवारी सायंकाळी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ड्रामा क्वीन अचानक रुग्णालयात दाखल झाल्याने चाहत्यांना धक्का बसला. अनेकांनी ती पुन्हा एकदा काहीतरी नौटंकी करत असावी असा कयास बांधला. मात्र, तिचा पूर्व पती रितेशने तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. आता राखीने स्वतःच्या तब्येतीबद्दल अपडेट दिली आहे.
राखीला नेमकं काय झालंय?
राखी सावंतने म्हटले की, मी लवकरच बरी होईल. माझी प्रकृती सध्या ठीक नाही. डॉक्टरांना माझ्या गर्भाशयात 10 सेमीचा ट्यमुर आढळला आहे. आता शनिवारी शस्त्रक्रिया होणार आहे. मी फार बोलू शकत नाही. त्यामुळे रितेश माझ्या प्रकृतीबाबत माहिती देत राहतील असे राखीने आपल्या निवेदनात म्हटले. मी अॅक्टर आहे, डॉक्टर नाही. त्यामुळे माझ्या आजारपणाबद्दल आताच फार काही सांगू शकत नाही असेही तिने म्हटले.
View this post on Instagram
मला आईचा आशीर्वाद, छोटा ट्युमर निघेल...
राखीने आपल्या निवेदनात म्हटले की, या हॉस्पिटलमधील डॉक्टर्स सर्वोत्तम आहे. या ठिकाणी ते आपले काम चांगल्या पद्धतीने करत आहेत. मी आयुष्यात कधीही हार मानली नाही. मी लहानपणापासून अनेक संकटावर मात केली आहे. अनेकदा संघर्ष केला आहे. मला आईचा आशीर्वाद असून ती माझ्यासोबत आहे. मी एक फायटर आहे आणि लवकरच परतेल. ही छोटीशी गाठ लवकरच निघेल असेही राखीने म्हटले.
View this post on Instagram
राखीच्या आजारपणावरून दोन्ही पूर्व पतींमध्ये जुंपली...
राखी सावंत रुग्णालयात अचानकपणे दाखल झाल्याने अनेकांना धक्का बसला. काहींना हा देखील तिचा स्टंट वाटला. तर, काहींनी तिच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. राखीच्या आजारपणाबाबत दोन भिन्न मतप्रवाह दिसत असताना तिच्या दोन्ही एक्स-पतींमध्ये मतभिन्नता दिसून आली आहे. राखी सावंतचा पूर्व पती रितेश सिहंने ती रुग्णालयात दाखल असल्याचे म्हटले. तर, तिचा दुसरा पूर्व-पती आदिलने कारवाईपासून वाचण्यासाठीच राखी सावंत हे नाटक करत असल्याचा दावा केला. त्यामुळे राखीच्या आजारपणावरुन तिचे दोन्ही पूर्व-पती भिडले आहेत.