(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray : आवडता बायोपिक कोणता? राज ठाकरे उत्तर देत म्हणाले...
Raj Thackeray : सर्वोत्कृष्ट बायोपिक कोणाचा होऊ शकत असेल तर तो इंदिरा गांधी यांचा आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray On Biopic : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत नुकताच 'अथांग' (Athang) या मराठी वेब सीरिजचा ट्रेलर लॉंच झाला. ट्रेलर लॉंच दरम्यान मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. तेजस्विनीने राज ठाकरेंना प्रश्न विचारला,"तुमच्यावर बायोपिक निघाला तर तुमची भूमिका कोणी साकारलेली तुम्हाला पाहायला आवडेल?
तेजस्विनी पंडितने राज ठाकरे यांना “तुमच्या स्वतःच्या आयुष्यात एवढा ड्रामा आहे, त्यात राजकारण आहे, लव्हस्टोरी आणि आयुष्यातले इतर चढउतार आहेत तर मग तुमच्यावर जर बायोपिक निघाला तर तुमची भूमिका कोणी साकारलेली पाहायला तुम्हाला आवडेल?” असा प्रश्न विचारला. ज्यावर राज ठाकरे यांनी फारच मजेदार उत्तर दिलं. राज ठाकरे यांचं उत्तर ऐकल्यानंतर तेजस्विनीलाही हसू आवरेनासं झालं.
तेजस्विनीने पुढे विचारलं,"पण जर आम्हाला तुमचा बायोपिक करायचा झाला तर तुम्ही संधी द्याल का? यावर उत्तर देत राज ठाकरे म्हणाले,"तसं काही असेल तर करा. माझी काहीच हरकत नाही. पण काही नसेल तर कशाला उगाच बनवायचं काही".
राज ठाकरे पुढे म्हणाले,"गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात बायोपिक येत आहे. पण जर सर्वोत्कृष्ट बायोपिक कोणाचा होऊ शकत असेल तर तो इंदिरा गांधी यांचा आहे. कारण त्यांचा संपूर्ण प्रवास हा रोलरकोस्टर राइडसारखा आहे. बायोपिक करताना योग्य व्यक्तीची निवड होणं गरजेचं आहे. आतापर्यंत आलेल्या बायोपिकपैकी 'गांधी' हा मला वाटतं सर्वोत्कृष्ट बायोपिक आहे".
'अथांग'मध्ये कलाकारांची मांदियाळी
'अथांग' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजमध्ये कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. निवेदिता जोशी सराफ, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, भाग्यश्री मिलिंद, शशांक शेंडे, योगिनी चोक, रसिका वखारकर आणि धैर्य घोलप हे कलाकार या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
मराठी सिनेमे, वेबसीरिज प्रेक्षकांपर्यंत का पोहोचत नाहीत यावर उत्तर देत राज ठाकरे म्हणाले,"मला सिनेमा पाहायला आवडतं. पण मी तज्ज्ञ नाही. माझ्या घरामध्ये एक ड्रोबो नावाचं मशीन आहे. या ड्रोबो मशिनमध्ये साडेआठ ते पावणेनऊ हजार चित्रपट आहेत. हे सर्व सिनेमे मी पाहिले आहेत."
संबंधित बातम्या
संबंधित बातम्या