Javed Akhtar : ED, CBI की इनकम टॅक्स? आम्हाला कशात अडकवणार? राज ठाकरेंसमोर जावेद अख्तर यांची फटकेबाजी
मनसेनं (MNS) आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) जावेद अख्तर (Javed Akhtar) आणि सलीम खान (Salim Khan) यांची मुलाखत घेतली.
Javed Akhtar : मनसेच्या (MNS) दीपोत्सवाचे यंदाचे 11 वर्ष आहे. यंदाच्या दीपोत्सवाचे काल (9 नोव्हेंबर) थाटात उद्घाटन झाले. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray), अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh), जावेद अख्तर (Javed Akhtar) आणि सलीम खान (Salim Khan) यांनी या दीपोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. दीपोत्सवामध्ये रितेश देशमुखनं जावेद अख्तर आणि सलीम खान यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये रितेशनं जावेद अख्तर आणि सलीम खान यांना लेखकाच्या मानधनाबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नाला जावेद अख्तर यांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
काय म्हणाले जावेद अख्तर?
रितेश देशमुख जावेद अख्तर यांना म्हणाला की, "जेव्हा एका चित्रपटात काम करण्यासाठी अभिनेते 15 लाख मानधन घेत होते, तेव्हा त्याच चित्रपटाचे सलीम-जावेद हे 25 लाख मानधन घेत होते"
रितेश देशमुखला जावेद अख्तर म्हणाले, "तुम्ही आम्हाला इनकम टॅक्समध्ये अडकवणार आहात का? ED, CBI की इनकम टॅक्स? आम्हाला कशात अडकवायला आवडेल? तुम्ही गरीब लेखकांची चेष्ठा करत आहात.", जावेद अख्तर यांचे हे उत्तर ऐकल्यानंतर दीपोत्सवाला उपस्थित असणारे लोक खळखळून हसले.
अभिनेत्यांपेक्षा जास्त मानधन लेखकांना मिळत होते?
त्यानंतर पुढे रितेश देशमुख म्हणाला, "तुमच्या काळात लेखकांना अभिनेत्यांपेक्षा जास्त पैसे मिळत होते?", यावर जावेद अख्तर म्हणाले, "कदाचित त्या काळात अभिनेते कमी मानधन घेत असतील."
'शोले' मधील 'तो' सीन आता लिहू शकत नाही: जावेद अख्तर
अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत देखील रितेश देशमुखनं जावेद अख्तर यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना जावेद अख्तर यांनी शोले चित्रपटातील एका सीनचा संदर्भ दिला. ते म्हणाले, 'शोले चित्रपटामध्ये शंकराच्या मंदिरातील सीन मी किंवा सलीमजी आता नाही लिहू शकत. आता आम्ही तो सीन लिहला तर त्यावर बराच गोंधळ निर्माण होऊ शकतो. आज आम्ही ते काहीच करु शकत नाही. कारण लोकांच्या भावना लगेच दुखावल्या जाऊ शकतात.'
मनसेच्या वतीने दरवर्षी दिवाळीत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. शिवाजी पार्कवर होणाऱ्या दीपोत्सवाची मनसैनिक आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा सलीम खान (Salim Khan) आणि जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी मनसेच्या 'दीपोत्सव 2023' च्या उद्धाटन कार्यक्रमाला हजेरी लावली. डॉन, सीता-गीता, मजबूर, क्रान्ती, त्रिशूल, शोले, मिस्टर इंडिया, शक्ति, जंजीर, शान, काला पत्थर, हाथी मेरे साथी, यादों की बारात, दीवार अशा अनेक हिट चित्रपटांचे लेखन सलीम-जावेद या जोडीने केलं आहे.
पाहा व्हिडीओ
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: