Shammi Kapoor: 'त्या' जाहिरातीमुळे शम्मी कपूर यांच्यावर भडकले होते राज कपूर
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शम्मी कपूर यांनी (Shammi Kapoor) त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
![Shammi Kapoor: 'त्या' जाहिरातीमुळे शम्मी कपूर यांच्यावर भडकले होते राज कपूर raj kapoor took class of shammi kapoor for working in pan masala advertaisment Shammi Kapoor: 'त्या' जाहिरातीमुळे शम्मी कपूर यांच्यावर भडकले होते राज कपूर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/16/476c5fdd9522dc04f8f9a1c6809557c8_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shammi Kapoor Pan Masala Ad: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शम्मी कपूर यांनी (Shammi Kapoor) त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ‘तुम सा नहीं देखा’, ‘दिल देके देखो’, ‘जंगली’, ‘कश्मीर की कली’, ‘तीसरी मंजिल’ आणि ‘एन इव्हनिंग इन पॅरेस’ या सुपर हिट चित्रपटांमध्ये शम्मी कपूर यांनी काम केले. शम्मी कपूर यांच्या अनेक आठवणी त्यांचे कुटुंबीय किंवा मित्र मैत्रिण मुलाखतींमध्ये सांगत असतात. अशाच एका आठवणीची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.
90च्या दशकात शम्मी कपूर यांनी पान मसाला कंपनीच्या जाहिरातीमध्ये काम केले होते. ही जाहिरात तेव्हा बरीच प्रसिद्ध झाली होती. या पान मसालाच्या जाहिरामध्ये शम्मी कपूर यांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अशोक कुमार यांच्यासोबत काम केले होते. या जाहिरातीमध्ये काम केल्याने शम्मी कपूर यांच्यावर राज कपूर भडकले होते. शम्मी कपूर यांनी खुलासा केला होता की, पान मसाला कंपनीच्या जाहिरातीमध्ये काम केल्याने हॉंगकॉंग एअरपोर्टवर असताना राज कपूर यांनी त्यांना सुनावले होते. शम्मी कपूर यांनी सांगितले की हॉंगकॉंग एअरपोर्टवर संपूर्ण कपूर कुटुंब होते. जेव्हा शम्मी कपूर हॉंगकॉंग एअरपोर्टवर आले तेव्हा तेथे जमा झालेल्या लोकांनी पान मसाल्याचे नाव घेण्यास सुरूवात केली. त्या जाहिरातीचे गाणे देखील ते लोक गात होते. शम्मी यांनी सांगितले की, त्यांच्यासाठी ही नवी गोष्ट नव्हती. सर्वांनी ती जाहिरात पाहिली पण राज कपूर यांनी पाहिली नाही.
शम्मी कपूर यांच्यावर राज कपूर भडकले होते.
एअरपोर्टवर कस्टम क्लियरंन्सनंतर राज कपूर हे शम्मी कपूर यांना म्हणाले की,'तुला स्वत:ची लाज नाही वाटत?' शम्मी यांनी सांगितले की,' मला समजले नाही काय झाले. त्यांनी मला खूप सुनावले. मी ती गोष्ट कधीच विसरू शकत नाही. ' शम्मी कपूर यांना राज कपूर म्हणाले, ' तीसरी मंज़िल, प्रोफेसर, दिल देके देखो कुठे गेले तुझे सर्व चित्रपट? तुला लोक पान मसाल्याच्या जाहिरातीवरून ओळखत आहेत. '
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)