एक्स्प्लोर

Sooryavanshi Release Date : 'सूर्यवंशी' चित्रपटाची प्रतिक्षा संपली, Akshay Kumar ने व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

Sooryavanshi On November 5: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' चित्रपटाची प्रतिक्षा संपली आहे. हा चित्रपट दिवाळीत 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Sooryavanshi On November 5 : बॉलिवूड अभिनेता (Akshay Kumar) चा आगामी चित्रपट 'सूर्यवंशी'ची (Sooryavanshi) प्रतिक्षा संपली आहे. लवकरच सिनेमागृहात चित्रपट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने (Rohit Shetty) केले आहे. चित्रपटात अक्षय व्यतिरिक्त अजय देवगण (Ajay Devgn) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत. अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंहने चित्रपटाचा व्हिडीओ शेअर करत 'सूर्यवंशी' सिनेमा प्रदर्शित होण्याची तारीख जाहीख केली आहे. हा चित्रपट दिवाळीत 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. 

अक्षय, अजय, रणवीरने शेअर केला खास व्हिडीओ
अक्षय, अजय आणि रणवीरने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते तिघेही चित्रपटगृहाच्या आत दिसून येत आहेत. व्हिडीओच्या सुरूवातीला अक्षय म्हणतो, "मित्रांनो या भिंती आठवत आहेत ना तुम्हाला, या भिंतींनी तुम्हाला अनेक रंगांच दर्शन घडवलेलं आहे. तुमचा आनंद, रडणं, प्रेम, राग हे सर्व या भिंतींना आठवत आहे. कधीच कोणी विचार केला नव्हता की चित्रपटातील मध्यंतरासारखा आयुष्यातदेखील मध्यंतर येईल. पण अंधाऱ्या रात्री नंतर सकाळ नक्कीच उजाडते. आता आम्ही आलो आहोत तुमच्या भेटीला."या व्हिडीओसोबत त्याने कॅप्शन लिहिले आहे, मध्यंतर आता संपले आहे,"कार्यक्रमाची वेळ सुरू झाली आहे, या दिवाळीत तुमच्या जवळच्या सिनेमागृहात 'सूर्यवंशी' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या आणि आमच्या आनंदात सामील व्हा #Backtocinema"

'सूर्यवंशी' सिनेमात कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. हा एक ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटात तिन्ही कलाकार पोलीसाची भूमिका साकारणार आहेत. रोहित शेट्टीच्या या चित्रपटात भन्नाट स्टंट पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट मागील वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे सर्व बंद असल्याने हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला नव्हता. पण आता हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणारे सिनेमे
येत्या आठवड्यात तापसी पन्नूचा 'रश्मि रॉकेट' झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तर 'सरदार उधम' हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.  'रश्मि रॉकेट' येत्या 15 ऑक्टोबरला तर 16 ऑक्टोबरला 'सरदार उधम' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

जाणून घ्या "हे"  चित्रपट कधी होणार प्रदर्शित
जॉन अब्राहमचा सत्यमेव जयते 2 सिनेमा 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सुनील शेट्टीची मुलगी अहान शेट्टीचा चित्रपट 'तडप' 3 डिसेंबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे. कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' 19 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. अजय देवगन, रकुलप्रीत आणि अमिताभ बच्चनचा'May Day' 29 एप्रिल 2022 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. शाहिद कपूर आणि मृणाल ठाकुरचा 'जर्सी' सिनेमा 31 डिसेंबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे. रणवीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त 'शमशेरा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा सिनेमा 18 मार्च,2022 ला प्रदर्शित होणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget