Rahul Jain: गायक राहुल जैनवर बलात्काराचा गुन्हा दाखल, कॉस्च्युम डिझायनरने केला आरोप
बॉलवूड गायक राहुल जैन याच्यावर कॉस्च्युम डिझायनरने बलात्काराचा आरोप केला असून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मुंबई: बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक राहुल जैन याच्यावर मुंबई पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. राहुल जैनवर 30 वर्षीय कॉस्च्युम डिझायनर महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असून, त्यामुळे त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 376, 323, 504, 506 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल जैन याने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.
राहुल जैन याने ड्रेस निवडण्यासाठी आपल्याला घरी बोलावलं आणि बलात्कार केल्याचा आरोप या कॉस्च्युम डिझायनर महिलेने केला आहे. त्यावेळी त्याच्या घरी कोणीही नव्हतं. पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे राहुल जैन याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण 2020 सालचं असल्याचं सांगितलं जातंय
पोलिसांनी 2020 पासून या प्रकरणाचा तपास केल्यानंतर अखेर दोन दिवसांपूर्वी राहुल जैनवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसली तरी लवकरच पोलीस राहुल जैनची चौकशी करणार आहेत.
मारहाण केल्याचा आरोप
संबंधित महिला ही कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम करते. तिला राहुल जैन याने घरी बोलावलं आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच यावेळी त्याने या महिलेला मारहाण केल्याचा आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचंही या महिलेने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे.
राहुल जैनने आरोप नाकारले
बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राहुल जैन यांने हे आरोप नाकारले आहेत. आपण या महिलेला ओळखत नाही, तिने केलेले आरोप हे निराधार असल्याचं त्याने म्हटलं आहे. या आधीही आपल्यावर अशा प्रकारचे आरोप झाले असून त्यावेळी ते खोटे असल्याचं स्पष्ट झालं होतं, त्यावेळी आरोप करणाऱ्या महिलेचा आता आरोप करणाऱ्या महिलेशी लागेबंधे असतील असंही राहुल जैन याने म्हटलं आहे.
गेल्या वर्षी एका महिलेने राहुल जैनवर बलात्काराचा आरोप केला होता. तसेच जबरदस्तीने गर्भपात करणे आणि फसवणूक केल्याचा आरोपही त्या महिलेने केला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
- सेल्फीसाठी 14 हजार, भेटण्यासाठी 38 हजार; अभिनेत्रीचे चाहत्यांसाठी नियम!
- IFFM Awards 2022 : डार्लिंग्ज हिट ठरल्यानंतर शेफाली शाहला बेस्ट अॅक्टरेसचा पुरस्कार, इंडियन फिल्म फेस्टीवल मेलबर्न 2022 मध्ये सन्मान
- Laal Singh Chaddha : 'लाल सिंह चड्ढा' पाहिल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
