Radhika Merchant : राधिका मर्चेंटने क्रूझ पार्टीत घातलेला Dior चा विंटेज ड्रेस; किंमत ऐकूण व्हाल थक्क
Radhika Merchant : राधिका मर्चेंटने क्रूझ पार्टीत Dior चा विंटेज ड्रेस परिधान केला होता. या ड्रेससोबत तिने लाखो रुपयांची बॅग कॅरी केली होती.
Radhika Merchant : अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) नुकतेच आपल्या दुसऱ्या प्री-वेडिंगहून भारतात परतले आहेत. याआधी अंबानी कुटुंबियांनी गुजरातमधील जामनगरात अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगचं आयोजन केलं होतं. पहिल्या प्री-वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. पण दुसऱ्या प्री-वेडिंगचे मात्र जास्त फोटो समोर आले नाहीत. पण तरीही प्री-वेडिंगचे काही फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांना मिळालेच. या फोटोंमध्ये अंबानी कुटुंबीय एन्जॉय करताना दिसत होते. तर दुसरीकडे राधिका मर्चेंटने आपल्या लग्जरी लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याआधी राधिकाचे अनेक लूक्स चर्चेत आलेले आहेत. पण चाहत्यांमध्ये सध्या तिच्या गुलाबी रंगाच्या विंटेज ड्रेसची चर्चा आहे. या फोटोमध्ये अंबानी कुटुंबियांची होणारी सून साधिका मर्चेंट खूपच सुंदर दिसत आहे.
सेकेंड प्री-वेडिंगच्या शेवटच्या दिवशी राधिकाने परिधान केलाय लाखो रुपयांचा ड्रेस
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचं सेकंड प्री-वेडिंग इटलीतील क्रूझवर पार पडलं. इटलीतील 'ला डोल्से वीटा'मध्ये पार पडलेल्या या इव्हेंटमध्ये राधिकाने कमाल लूक कॅरी केला होता. या इव्हेंटसाठी राधिकाने गुलाबी रंगाचा मिडी ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसची किंमत ऐकूण प्रत्येक जण हैराण होईल. या इव्हेंटसाठी राधिकाने 1959 मधील Christian Dior कॉकटेल ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये राधिका खूपच सुंदर दिसत होती.
राधिकाच्या 'त्या' ड्रेसची किंमत किती होती?
राधिकाने परिधान केलेला कॉकटेल ड्रेस रास्पबेरी सिल्कचा आहे. आधी या ड्रेसची किंमत 1500 ते 2000 डॉलरच्या आसपास होती. पण विंटेज क्लोदिंग एक्सपर्ट डोरिस रेमंडने 2016 मध्ये या ड्रेसचा लिलाव केला. त्यानंतर या ड्रेसची किंमत आणखी वाढली. या 'डायर हाउते कॉचर' ड्रेसचा लिलाव 3,840 अमेरिकन डॉलरमध्ये करण्यात आला आहे. भारतीय चलनानुसार, या ड्रेसची किंमत 3,19,416 रुपये आहे. एकंदरीत राधिका मर्चेंटने आपल्या सेकंड प्री-वेडिंगमध्ये परिधान केलेल्या ड्रेसची किंमत 3 लाखांपेक्षा अधिक आहे".
View this post on Instagram
बॅगची किंमत किती?
राधिका मर्चेंटने आपल्या गुलाबी विंटेड Dior ड्रेससोबत एक बॅग कॅरी केली होती. या बॅगची किंमत चाहत्यांना हैराण करणारी आहे. राधिकाने आपल्या ड्रेससोबत 'हर्मीस मिनी केली' गुलाबी पर्स घेतली होती. या बॅगची किंमत 22.5 लाख रुपये आहे. राधिकाने आपला लूक हँगिसी फ्लेट्स, पोनीटेल स्कार्फ आणि टियरड्रॉप इयरिंग्ससह पूर्ण केला होता.
संबंधित बातम्या