Shah Rukh Khan New Look : अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमधील शाहरुख खानचा नवा लूक व्हायरल; Johnny Depp सोबत होतेय तुलना
Shah Rukh Khan Look From Anant Ambani Radhika Merchant 2nd Pre-Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंगला शाहरुख खानने आपल्या कुटुंबियांसमवेत हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील शाहरुख खानचा एक नवा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
![Shah Rukh Khan New Look : अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमधील शाहरुख खानचा नवा लूक व्हायरल; Johnny Depp सोबत होतेय तुलना Anant Ambani Radhika Merchant 2nd Pre Wedding Shah Rukh Khan New Look Viral Compared to Johnny Depp Know Bollywood Entertainment Latest Update Marathi News Shah Rukh Khan New Look : अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमधील शाहरुख खानचा नवा लूक व्हायरल; Johnny Depp सोबत होतेय तुलना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/03/3fcdb079efbd367ffa81b795085275e71717404831095254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Anant Ambani Radhika Merchant 2nd Pre-Wedding : देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांचा दुसरा प्री-वेडिंग कार्यक्रम नुकताच पार पडला आहे. या खास कार्यक्रमानिमित्त विविध सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. चार दिवस चालणारं हे दुसरं प्री-वेडिंग खूपच खास होतं. क्रूज पार्टीतील सिद्धार्थ मल्होत्रा, जान्हवी कपूर, कियारा आडवाणी, शनाया कपूर आदि सेलिब्रिटींचे फोटो समोर आले आहेत. अशातच शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये किंग खानचा रॉयल लूक पाहायला मिळत आहे.
शाहरुख खानचा नवा लूक व्यायरल (Shah Rukh Khan New Look Viral)
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये किंग खानचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे. शाहरुख आपल्या 'पठाण' (Pathaan) लूकमध्ये दिसून आला. व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुख खानचे लांबलचक केस आणि फ्रेंच बीयर्ड दिसून येत आहे. निळ्या आऊटफिटमध्ये त्याने पांढऱ्या रंगाचा स्टोल कॅरी केला आहे. या फोटोमध्ये शाहरुख खानसोबत रणबीर कपूरदेखील झळकला. या फोटोमध्ये रणबीर कपूर चॉकलेट बॉय म्हणून दिसत आहे.
Shah Rukh Khan, Abram, and Ranbir Kapoor in Portofino, Italy, to celebrate the pre-wedding of Anant & Radhika ❤️🔥@iamsrk @gaurikhan #ShahRukhKhan #AnantAmbani #RadhikaMerchant #AmbaniPreWedding #Ambani pic.twitter.com/MlIlcRf7TR
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) June 2, 2024
जॉनी डेपसोबत होतेय शाहरुखची तुलना
फोटोमध्ये शाहरुख खान त्याला लाडका लेक अबराम खानसोबत चिल करताना दिसून येत आहे. शाहरुख खानचा फोटो त्याच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. यात शाहरुख खानची तुलना जॉनी डेपसोबत होताना दिसत आहे. त्याच्या फोटोवर एका चाहत्याने लिहिलं आहे,"शाहरुखचा हा लूक जॉनी डेपसोबत जुळणारा आहे". दुसऱ्या नेटकऱ्याने बॅड कॉपी असं लिहिलेलं आहे".
अनंत-राधिका लग्नबंधनात कधी अडकणार? (Anant Ambani Radhika Merchant Wedding Update)
शाहरुख खानचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो संपूर्ण कुटुंबासोबत एन्जॉय करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये अनंत अंबानीदेखील दिसून येत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट 12 जुलै 2024 रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. 12 ते 14 जुलै त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. हिंदी रिती-रिवाजानुसार मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे.
View this post on Instagram
संबंधित बातम्या
Shah Rukh Khan : शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)