एक्स्प्लोर

Radhika Merchant : 'राधा ही बावरी'! आलियाच्या लेकीपेक्षाही क्यूट होती मुकेश अंबानींची सून; बालपणीच्या फोटोंनी वेधलं लक्ष!

Radhika Merchant : राधिका मर्चंटचा लहानपणीचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. राधिकाच्या गोंडस फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Radhika Merchant Childhood Photo : देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरी लवकरच लगीनघाईला सुरुवात होणार आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) लवकरच बोहल्यावर चढणार आहे. राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) तो लग्नबंधनात अडकणार आहे. अंबानींच्या होणाऱ्या सूनेबद्दल जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. अशातच आता राधिकाचा लहानपणीचा एक फोटो (Radhika Merchant Childhood Photo) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राधिका मर्चंटबद्दल प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सध्या राधिकाचा लहानपणीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये राधिका राहापेक्षा सुंदर दिसत आहे. तिच्या गोंडस रुपाने चाहत्यांना भुरळ घातली आहे. राधिकाचा बालपणीचा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Radhika Merchantfp (@radhikamerchant.real)

राधिका मर्चंट कोण आहे? (Who is Radhika Merchant)

राधिका मर्चंट ही उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. वीरेन मर्चंट हे 'इनकोर हेल्थकेअर' कंपनीने मुख्य अधिकारी आणि उपाध्यक्ष आहेत.  मुंबईतील 'कॅथेड्रल अॅण्ड जॉन कॉनन' या शाळेत राधिकाचं शालेय शिक्षण झालं आहे. न्यूयॉर्क विद्यापीठातून राधिकाने 'राज्यशास्त्र' आणि 'अर्थशास्त्र' विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. 

शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात परतल्यानंतर राधिकाने 2017 मध्ये 'इस्प्रवा' नामक एका रिअल इस्टेट कंपनीमध्ये सेल्स एग्जीक्यूटिव्ह म्हणून काम केलं आहे. राधिका खूपच महत्त्वकांक्षी आहे. माणसाने महागड्या गोष्टी खरेदी करण्यापेक्षा विचाराने श्रीमंत व्हावं, असे राधिकाचे विचार आहेत. राधिका मर्चंटचा मोठा चाहतावर्ग आहे. राधिका मर्चंटचा जन्म 18 डिसेंबर 1994 रोजी झाला आहे. राधिका एक उत्कृष्ट नृत्यांगना आहे. राधिका मर्चंटने गुरु सुश्री भावना ठाकर यांच्याकडून नृत्याचे धडे गिरवले आहेत. भरतनाट्यम या नृत्यप्रकारात तिने शिक्षण घेतलं आहे. 

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात (Anant Ambani Radhika Merchant Wedding Date)

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्यासाठी 2024 हे वर्ष खूपच खास आहे. 1 मार्च 2024 पासून राधिका-अनंतच्या प्री-वेडिंग फंक्शनला सुरुवात होणार आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. राधिका आणि अनंत यांचा जानेवारी 2023 मध्ये साखरपुडा झाला होता. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आता राधिका आणि अनंतने संसार थाटण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या

Mukesh Ambani : काय सांगता! मुकेश अंबानींचा लेकापेक्षा सुनेवर जास्त विश्वास? मुलाने केला खुलासा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझाTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaUddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरेUddhav Thackeray : बाळासाहेबांचा जिव्हाळा असलेल्या शहरात झालेला गद्दाराचा विजय खटकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
Sharad Pawar : 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
×
Embed widget