Chhagan Bhujbal speech Chakan: राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवारांसमोर पहिलं भाषण, भुजबळ भरभरुन बोलले
Chhagan Bhujbal speech Chakan: राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवारांसमोर पहिलं भाषण, भुजबळ भरभरुन बोलले
पुण्यातील (Pune) चाकण बाजार समितीमध्ये आज (दि.3) सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) उपस्थित होते. यावेळी शरद पवारांनी (Sharad Pawar) छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) पत्रिकेवर एक लिखित संदेश दिला, त्यानंतर दोघांमध्ये काही सेकंदाचा संवाद ही झाला अन् दोघे एकमेकांकडे हसू ही लागले. हे सगळं घडलं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण सोहळ्यात पाहायला मिळालं.
सावित्रीबाई फुलेंच्या पुतळा अनावरण सोहळ्यात पवार -भुजबळ एकत्र
दरम्यान, चाकण बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर शरद पवार आणि छगन भुजबळ हे दोघेही 5 वाजून 45 मिनिटांनी पोहचले. सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण पवारांच्या हस्ते पार पडणार होतं. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री छगन भुजबळ होते. त्यामुळं मंचावर दोघे एकमेकांच्या बाजूला बसले होते.