Radhe Shyam : प्रभासचा 'राधे श्याम' आता ओटीटीवर येणार, 'या' भाषेत होणार प्रदर्शित
Radhe Shyam : 1 एप्रिलपासून 'राधे श्याम' सिनेमा प्रेक्षकांना अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहे.
Radhe Shyam On Ott : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि पूजा हेगडेचा (Pooja Hegde) 'राधे श्याम' (Radhe Shyam) सिनेमा प्रेक्षकांना 1 एप्रिलपासून अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहे.
राधा कृष्ण कुमारने 'राधे श्याम' सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या रोमॅंटिक सिनेमात पूजा हेगडे, सचिन खेडेकर, प्रियदर्शी पुलीकोंडा, भाग्यश्री, जगपती बाबू, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर, रिद्धी कुमार, साशा छेत्री, सत्यान मुख्य भूमिकेत आहेत.
View this post on Instagram
'राधे श्याम' सिनेमा तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरदेखील चांगली कमाई केली आहे. हा सिनेमा 11 मार्चला तेलुगू, हिंदी, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. प्रभास आणि पूजा हेगडे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या
Oscars 2022 : ऑस्कर विजेत्या 'ड्युन' चित्रपटाच्या व्हीएफएक्सची धुरा सांभाळणारे भारतीय वंशाचे नमित मल्होत्रा! जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
Oscar 2022 : 'कोडा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, ऑक्सर पुरस्कार सोहळ्यात मिळाले स्टँडिंग ओव्हेशन
Sher Shivraj New Poster : ‘जावळीच्या जंगलाचा राजा एकच...!’, ‘शेर शिवराज’चे जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha