Oscar 2022 : 'कोडा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, ऑक्सर पुरस्कार सोहळ्यात मिळाले स्टँडिंग ओव्हेशन
Oscar 2022 : 'कोडा' सिनेमाला ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
Oscar 2022 : ऑस्कर (Oscars 2022 ) पुरस्कार सोहळ्याची जगभरातील सेलिब्रिटी आतुरतेने वाट पाहत असतात. कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर जेसिका ब्रेस्टनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. पण 'ऑस्कर 2022' मध्ये 'कोडा' (Coda) सिनेमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 'कोडा' सिनेमाला ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे या सिनेमाला स्टँडिंग ओव्हेशनदेखील मिळाले आहे.
'कोडा' हा सिनेमा 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा मूकबधिर लोकांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यामुळे हा सिनेमा सिने प्रेक्षकांच्या मनाला चांगलाच भिडला. हा सिनेमा 'ला फॅमिल बेलियर' या फ्रेंच सिनेमाचा रिमेक आहे. सियान हेडरने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
'कोडा' सिनेमात चार जणांचे कुटुंब दाखवण्यात आले आहे. आई-वडील आणि दोन भावंडे अशी चार पात्रे या सिनेमात आहेत. ते मत्स्यपालनचा व्यवसाय करत कुटुंब चालवतात. या कुटुंबातील चारपैकी तीन जण मूकबधिर आहेत. तर कुटुंबातील रुथ मात्र ऐकू बोलू शकते. ती संगीत क्षेत्रात चांगलीच प्रगती करते. पण तिचं गाणं मात्र तिच्या कुटुंबियांना ऐकू येत नाही.
'कोडा' सिनेमात रुथची भूमिका अभिनेत्री एमिलिया जोन्सने साकारली आहे. तर ट्रॉय कोटसर सिनेमात फ्रँक रॉसीचे पात्र साकारले आहे. तसेच सिनेमात डॅनियल ड्युरंट, युजेनियो डर्बेझ, मार्ली मॅटलिन, फर्डिया वॉल्श-पीलो यांच्यादेखील मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी अभिनेता ट्रॉय कोटसरच्या नावाची घोषणा करण्यात आली. ट्रॉय कोटसरला सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेचा पुरस्कार मिळाला. ट्रॉय पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर जात असताना थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होत होता. ट्रॉयने सिनेमात एका कर्णबधिर व्यक्तीची भूमिका साकारली होती.
संबंधित बातम्या
Will Smith Won Oscars 2022 : विल स्मिथ, हॉलिवूडमधील घराघरात पोहोचलेलं नाव, अष्टपैलू 'फ्रेश प्रिन्स'ची गाजलेली कारकीर्द
Oscars 2022 : भारताची 'रायटिंग विथ फायर' डॉक्यूमेंट्री ऑस्करच्या शर्यतीत राहिली मागे; पाहा कोणत्या चित्रपटानं पटकावला पुरस्कार
Oscars 2022 : ऑस्करमध्ये 'ड्युन'चा ‘सिक्सर’! ‘बेस्ट फिल्म एडिटिंग’ ते ‘बेस्ट सिनेमॅटोग्राफी’सह पटकावले 6 पुरस्कार!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha