एक्स्प्लोर

Radhe movie review | राधे : 'अनवाँटेड' भाई

सगळ्यात शेवटी इंडस्ट्रीतला 30 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव गाठीशी असताना भाईजान अशा 'अनवाँटेड' फिल्म्स का करत असावा असा प्रश्न मात्र सतत मनात येत राहतो. पिक्चर बिक्चरमध्ये या चित्रपटाला मिळतायत दीड स्टार.

सलमानचा सिनेमा असला की त्याला गोष्ट नसली तरी चालते असं म्हणतात. कारण तो करत असलेल्या हाणामाऱ्याच पाहायला लोक येतात. त्याने तसे काही सिनेमे केले. पण नंतर त्याच्या सिनेमांना गोष्ट येऊ लागली. काळाबरोबर सलमानही बदलत होता. नुसते मारहाणीचे सिनेमे करण्यापेक्षा ज्याला गोष्ट असेल असे सिनेमे घेऊन सलमान सिनेमात हाणामारी करू लागला. वाँटेड, बजरंगी भाईजान, दबंग अशी बरीच उदाहरणं देता येतील. कारण, लोकांना फक्त मारामारी नको होती. तर त्यात इमोशन्स हव्या होत्या. कारण मारामारी बघायची तर हॉलिवूडपट होताच. बऱ्याच दिवसांनी सलमानचा नवा चित्रपट येणार म्हणून उत्सुकता होती. सिनेमाचा दिग्दर्शकही प्रभूदेवा असल्यामुळे त्याला मालमसाला कुठे काय घालायचा हे कळतं असा समज आहे. त्यामुळे सलमान आणि प्रभूदेवा हे कॉम्बिनेशन राधे-युवर मोस्ट वाँटेड भाई काय मनोरंजन करतं याकडे सगळ्याचं लक्ष होतं. अखेर ईदचा मूहूर्त साधत राधे ओटीटीवर दाखल झाला आहे. सिनेमात हाणामारी तर ठासून भरली आहे. पण ती वगळता या सिनेमात फार काही नाही. गेला बाजार तांत्रिकदृष्ट्या गोष्टीचा समावेश या सिनेमात आहे. पण सलमान त्या गोष्टीला फार जुमानताना दिसत नाही. म्हणूनच सिनेमाची गोष्ट खरंतर भावनाप्रधान असूनही तो भाव ना प्रधान असा झाला आहे. त्यात सततच्या गाण्यांनी सिनेमाचा मूड आणखी घालवला आहे. 

राधेची गोष्ट वर म्हटल्याप्रमाणे भावनाप्रधान आहे. म्हणजे, मुंबई शहरात अंमली पदार्थांचा सुळसुळाट झाला आहे. राणा नावाचा एक तस्कर दिल्लीतून मुंबईला पैसै कमवायला आला आहे. ड्रगचं रॅकेट तयार करून त्याला मुंबईवर राज्य करायचं आहे. म्हणून त्याने शहरातल्या युवा वर्गाला हाताशी धरलं आहे. गावात मृत्यूतांडव चालू आहे. तरुणाई ड्रगच्या विळख्यात अडकली आहे. आता यातून गावाला सोडवणारा कोणी माई का लाल आहे की नाही? असा सवाल, नेहमीचे मंत्री नेहमीच्या राऊंड टेवलवर बसलेल्या नेहमीच्या उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याना विचारतात. आणि मग त्यातलाच एक अधिकारी अब उसे बुलाना पडेगा असं म्हणून नेहमीप्रमाणे निलंबित झालेल्या एका पोलिसाला बोलावतात.. तो असतो राधे. मग पुढे काय होतं.. हे इथं सांगायला नको. एव्हाना चतुर वाचकांनी ते ताडलं असेलच. 

तर अशी ही गोष्ट. यात मग जमेल तशी गाणी घुसडण्यात आली आहेत. सिनेमात दिशा पटानी आहे हे दाखवायला ही गाणी आहेत. पण त्यातलं एकही गाणं लक्षात राहात नाही. खरंतर गाणी ही एकच गोष्ट त्यात जरा लयीत आणि एकसंघ दिसणारी अशी बाब आहे. पण दुर्दैवाने ही गाणीच लक्षात रहात नाहीत. कुठून तरी राधे येतो आणि चोपतो. इतकंच सिनेमाभर दिसत राहतं. सुरूवातीला यात दोन ठिकाणी पास्ट फॉर्वर्ड ट्रिक वापरली गेली आहे. म्हणजे, आधी राधे येतो आणि मग तो कसा आला ते तो संबंधित इसमांना दाखवतो. अशा प्रकारे काही सीन आहेत. पण नंतर नेहमीप्रमाणे मारधाड सुरू होते. यात दिशा आणि सलमानमधले प्रसंग तर केवळ गरज म्हणून या सिनेमात आले आहेत. दिशाचं सलमानला भोले म्हणून संबोधणं तर कमालीचं हस्यास्पद आहे. 

सिनेमाचा एकूण क्लायमॅक्स.. राणासोबतची हाणामारी हे सगळंच केवळ व्हीएफएक्सवर केल्यासारखं दिसतं. तात्पर्य ते खोटं वाटतं. नाही म्हणायला, मराठी सिनेवर्तुळातले दोन चेहरे यात दिसतात. एक आहे प्रवीण तरडे आणि दुसरा सिद्धार्थ जाधव. प्रवीण तरडेने यात दगडू भाईचं काम केलं आहे. तर सिद्धार्थ जाधव यात एका हॉटेलचा मालक दाखवला आहे. दोघांच्या डिक्शनचा, टायमिंगचा यात चांगला वापर दिग्दर्शकाने करून घेतला आहे. या सगळ्यात हस्यास्पद आहेत ते जग्गू दादा अर्थात जॅकी श्रॉफ. त्यात ते राधेचे बॉस दाखवले आहेत. त्यातल्या एका पार्टीत त्यांनी दिशासारख्या वेशभूषेत वावरणं तर हैट आहे. यात एकच भाव खाऊन जातो तो राणा. म्हणजे, रणदिप हुडा. खरंतर तोच या सगळ्यात रिएलिस्टिक अभिनय करणारा. पण त्याला फार डायलॉगच दिलेले नाहीत. तो फक्त येतो आणि चोपायला सुरूवात करतो असा सगळा मामला आहे. 

बाकी, सिनेमेटोग्राफी, एडिटिंग, व्हिएफएक्स.. याना अंशत: महत्व देण्यात आलं आहे. सेट, लोकेशन्सवर प्रचंड खर्च करण्यात आला आहे. पैकी काही लोकेशन्स गााण्यासाठी तयार करण्यात आली आहेत. संवादांमध्ये आजवरच्या इतर सिनेमांत ऐकलेले संवादच या सिनेमातही सापडतात. एक बार मैने कमिटमेंट कर दी.. हे तर यात आहेच आहे. एकुणात, नुसत्या सलमानला पाहण्यासाठी राधे पाहायचा तर पहा. पण मारामारी करताना यात तो जेवढा सहन होतो तेवढाच दिशासोबत कॉमेडी करताना बेगडी वाटतो. सिनेमात सल्लूमियांचं वयही दिसू लागलं आहे. अत्यंत गरजेपुरतं तोंड उघडून ते आपले संवाद बोलतात हे एव्हाना तज्ज्ञ प्रेक्षकांच्या लक्षात आलं असेलच. पण जबड्याची ही हालचालही हळूहळू आणखी आकुंचन पावताना या सिनेमात पाहायला मिळतं. या सिनेमात उठून दिसतो तो सलमानचा फिटनेस. त्याची तब्येत. या सिनेमातही त्याने सुरूवातीलाच आपली बेअर बॉडी दाखवली आहे. तंत्रज्ञानाची जोड असली तरी सलमानच्या फिटनेस का जवाब नही. 

इतकं सगळं सांगून झाल्यावर सिनेमा पाहावा वाटत असेल तर पाहा. नाहीतर, फार काही गमावणार नाही तुम्ही हे नक्की. एक वाटत राहतं, भरपूर पैसा.. सलमानसारखा ब्रँड.. देखणी नायिका.. प्रवीण तरडे, रणदिप हुडासारखे चांगले कलाकार.. असताना आणि सगळ्यात शेवटी इंडस्ट्रीतला 30 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव गाठीशी असताना भाईजान अशा 'अनवाँटेड' फिल्म्स का करत असावा असा प्रश्न मात्र सतत मनात येत राहतो. पिक्चर बिक्चरमध्ये या चित्रपटाला मिळतायत दीड स्टार. 

Zee5 ओटीट प्लॅटफॉर्म क्रॅश

सलमानच्या चित्रपटांना जशी सिनेमागृहात तुफान गर्दी होते. अगदी तशीच गर्दी ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पहायला मिळाली. यामुळे Zee5 ओटीट प्लॅटफॉर्म क्रॅश झाले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
Embed widget