Allu Arjun: हिंदी चित्रपटात काम करणार का? 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुन म्हणतो, 'अवघड वाटतं...'
बॉलिवूडमध्ये अल्लू अर्जुन (Allu Arjun) कधी काम करणार? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. आता एका मुलाखतीमघ्ये याबाबत अल्लू अर्जुननं माहिती दिली.
Allu Arjun : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुननं (Allu Arjun) त्याच्या ‘पुष्पा’ (Pushpa: The Rise) या चित्रपटामधून विशेष लोकप्रियता मिळवली. आता अल्लू अर्जुनचे चाहते पुष्पाः2 या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. बॉलिवूडमध्ये अल्लू अर्जुन कधी काम करणार? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. आता एका मुलाखतीमघ्ये याबाबत अल्लू अर्जुननं माहिती दिली.
काय म्हणाला अल्लू अर्जुन
मुलाखतीमध्ये अल्लू अर्जुन म्हणाला,'हिंदी चित्रपटात काम करणे हे एखादा टास्क करण्यासारखं आहे. कारण हे काम मला खूप अवघड वाटतं. माझ्यासाठी हे खूप अवघड टास्क आहे. पण योग्य वेळ अली आणि संधी मिळाली तर मी नक्की हिंदी चित्रपटांमध्ये काम करेल. हिंदी चित्रपटामध्ये काम करणं हे सध्या माझ्या कंफर्ट झोनच्या बाहेर आहे. पण गरज पडली तर मी या कंफर्ट झोनच्या बाहेर येईल. '
लवकरच रिलीज होणार पुष्पा चित्रपटाचा दुसरा पार्ट
पुष्पा द राइज हा चित्रपट 2021 मध्ये जगभरात रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘पुष्पा: द रूल’ असं या दुसऱ्या भागाचं नाव आहे. रिपोर्टनुसार, ‘पुष्पा: द रूल’ हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार आहे. ‘पुष्पा: द रूल’ चित्रपटाचं शूटिंग डिसेंबर 2022 मध्ये सुरु होणार आहे. रिपोर्टनुसार, अभिनेता विजय सेतुपती हा पुष्पा: द रूल या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल, जगदीश, अजय घोष, सुनील आणि अनसूया या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागात विजय सेतुपतीची एन्ट्री होणार असल्यानं चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
हेही वाचा: