Pushpa The Rule : ‘पुष्पा 2’साठी अल्लू अर्जुनने वाढवलं वजन? अभिनेत्याचे नवे फोटो पाहून चाहते झाले अवाक्!
Pushpa The Rule : अल्लू अर्जुनच्या ‘Pushpa The Rule या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून, अल्लू अर्जुन (Allu Arjun) त्यासाठी खूप मेहनत घेत आहे.
Pushpa The Rule : साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनचा 'पुष्पा : द राईज' (Pushpa The Rise) हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट झाल्यानंतर आता चाहते त्याच्या पुढच्या भागाची अर्थात ‘पुष्पा : द रुल’ची (Pushpa The Rule) आतुरतेने वाट पाहत आहेत. अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून, अल्लू अर्जुन (Allu Arjun) त्यासाठी खूप मेहनत घेत आहे. नुकताच अल्लू अर्जुन या चित्रपटाच्या सेटवर स्पॉट झाला. यावेळी अभिनेता वाढलेले केस आणि दाढीसह ‘पुष्पा’ लूकमध्ये दिसला. मात्र, यावेळी त्याने वजन प्रचंड वाढलेले दिसले.
अल्लू अर्जुनने ‘पुष्पा 2’साठी (Pushpa 2) वजन वाढवले आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा द रुल’ या चित्रपटातील लूकचे हे फोटो पाहून चाहते खूपच उत्साहित झाले आहे. तर, सोशल मीडियावर या चित्रपटाच्या कथेला नेमकं काय वळण मिळेल, याचा अंदाज लावताना दिसत आहेत. मात्र, या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनने आपले वजन खूप वाढवले आहे. सेलिब्रेटी फोटोग्राफर मानव मंगलानी यांनी हा फोटो शेअर केला आहे.
पाहा फोटो :
वाढलेल्या वजनामुळे अभिनेता ट्रोल!
अल्लू अर्जुनचा हा लूक पाहून काही चाहते त्याचे कौतुक आकारताना दिसले तर, काही मात्र त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत होते. ट्रोलर्सनी अल्लू अर्जुनला ट्रोल करण्याची ही संधी देखील सोडली नाही. अल्लू अर्जुनचे अनेक चाहते त्याच्या या फोटोवर कमेंट करताना दिसले. काहींनी तर या फोटोवर अतिशय वाईट कमेंट्स देखील केल्या आहेत. एका यूजरने 'वडापाव लूक' अशी कमेंट केली. त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले की, 'लसित मलिंगा, खूप दिवसांनी तुला पाहिले...'
'पुष्पा द रुल'च्या कथेत येणार ट्वीस्ट?
‘पुष्पा’ (Pushpa: The Rise) चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटामधील गाण्यांना तसेच, डायलॉग्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. चित्रपटामध्ये अभिनेता अल्लू अर्जुननं आणि अभिनेत्री रश्मिका मंदनानं (Rashmika Mandana) प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहे. रश्मिकाने या चित्रपटामध्ये श्रीवल्ली ही भूमिका साकारली होती. पुष्पा चित्रपटाच्या दुसऱ्या भागातमध्ये ‘श्रीवल्ली’ या पात्राचा मृत्यू होणार आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु झाली आहे.
हेही वाचा :
Pushpa The Rule : प्रतीक्षा संपली; Allu Arjun करणार 'पुष्पा द रुल' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात
Vikram : पुष्पा नंतर आता विक्रमची क्रेझ; क्रिकेटर वॉशिंग्टन सुंदरकडून भन्नाट व्हिडीओ शेअर
VIDEO : नेपाळच्या महिला बोलरचं मैदानातच 'पुष्पा सेलिब्रेशन', ICC ने पोस्ट केला व्हिडिओ