Rashmika Mandanna : रणवीर सिंगच्या ‘या’ चित्रपटाची फॅन झालीये रश्मिका, पाहा काय म्हणाली नॅशनल क्रश...
Rashmikas’s Favorite Film : रश्मिका आता बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ या चित्रपटात दिसणार आहे.
Rashmika Mandanna : ‘नॅशनल क्रश’ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) सध्या चर्चेचा भाग बनली आहे. तिचा ‘पुष्पा: द राईज’ (Pushpa : The Rise) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. रश्मिकाचा 'पुष्पा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून, तिने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले आहेत. साऊथसोबतच रश्मिकाने बॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवला आहे.
रश्मिका आता बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ या चित्रपटात दिसणार आहे. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वीच रश्मिकाची खूप मोठी फॅनफॉलोईंग आहे. रश्मिकाने फार कमी वेळात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. साऊथमध्ये धमाल केल्यानंतर ती आता बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. तिने एक नाही, तर दोन बॉलिवूड चित्रपट साईन केले आहेत. रश्मिकाला बॉलिवूडचे भरपूर ज्ञान आहे आणि तिला बॉलिवूड चित्रपट पाहायला आवडतात.
रणवीर सिंगचा चित्रपट आवडता!
बॉलिवूड बबल्सला दिलेल्या मुलाखतीत, रश्मिकाला महिला दिग्दर्शकाने दिग्दर्शित तिच्या आवडत्या तीन चित्रपटांबद्दल सांगण्यास सांगितले होते. यात रश्मिकाने ‘जी ले जरा’, ‘डिअर जिंदगी’ आणि ‘गली बॉय’ या चित्रपटांची नावे घेतली. यानंतर रश्मिकाने सांगितले की, मला रणवीर सिंगचा (Ranveer Singh) ‘गली बॉय’ चित्रपट खूप आवडतो.
‘जी ले जरा’ची आतुरतेने पाहतेय वाट
रश्मिकाने सांगितले की, ती या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. ती म्हणाली की, मी बहुतेक चित्रपटांबद्दल जास्त काही शेअर करत नाही. पण, जेव्हा मी या चित्रपटाची स्टारकास्ट पाहिली, तेव्हा मला तीन महिला दिसल्या आणि मग मला वाटले की, ही माझीच कथा असणार आहे. मी या चित्रपटाची पहिली प्रेक्षक असणार आहे. पुष्पाच्या दुसऱ्या भागात रश्मिका अल्लू अर्जुनसोबत दिसणार आहे, चित्रपटाचा दुसरा भाग या वर्षी रिलीज होणार आहे.
हेही वाचा :
- Happy Birthday Preity Zinta : दोनवेळा मृत्यूला परतवलं, त्सुनामीत गमावले जवळचे मित्र, प्रीती झिंटाच्या आयुष्यातल्या ‘या’ गोष्टी माहितीयेत का?
- Tu Tevha Tashi : 'तू तेव्हा तशी' म्हणत स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन!
- Cheslie Kryst Suicide : ‘मिस अमेरिका 2019’ चेल्सी क्रिस्टची आत्महत्या, इमारतीवरून उडी घेत संपवलं आयुष्य
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha