![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pushpa 2: तुरुंगातून फरार झालेला पुष्पा कुठं गेलाय? उत्तर मिळालं, पाहा पुष्पा-2 चा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ
आता पुष्पाः2 (Pushpa 2) चित्रपटाचा एक व्हिडीओ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा खास लूकमध्ये दिसत आहे.
![Pushpa 2: तुरुंगातून फरार झालेला पुष्पा कुठं गेलाय? उत्तर मिळालं, पाहा पुष्पा-2 चा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ Pushpa 2 Pushpa The Rule of Allu Arjun rashmika mandanna film video release Pushpa 2: तुरुंगातून फरार झालेला पुष्पा कुठं गेलाय? उत्तर मिळालं, पाहा पुष्पा-2 चा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/07/3c90e7de84f21ab79a495a0f8aa0462f1680865263945259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pushpa 2: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा (Pushpa: The Rise - Part 1) या चित्रपटानं केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली. पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली आणि पुष्पाची केमिस्ट्री, या चित्रपटामधील गाणी, अॅक्शन सिन्स या सर्वांनीच प्रेक्षकांची मनं जिंकली. आता पुष्पाः2 (Pushpa 2) चित्रपटाचा एक व्हिडीओ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुन हा खास लूकमध्ये दिसत आहे.
तुरुंगातून फरार झालेला पुष्पा कुठं गेलाय?
टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर पुष्पा-2 या चित्रपटाचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला एक वृत्तनिवेदक पुष्पाबद्दल माहिती देताना दिसत आहे. तो म्हणतो, 'तिरुपती तुरुंगातून पुष्पा फरार झाला आहे.' तर दुसरी न्युज अँकर म्हणते, 'पुष्पाला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या' आता तुरुंगातून फरार झालेला पुष्पा हा कुठे गेला आहे? असा प्रश्न सर्वांना पडतो. पण याचं उत्तर या व्हिडीओच्या शेवटी कळते. पुष्पा हा तुरुंगातून फरार होऊन जंगलामध्ये जातो. एका कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये पुष्पाची झलक दिसते.
टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आलेल्या पुष्पा-2 चित्रपटाच्या या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुन 'अब रुल पुष्पा का' हा डायलॉग म्हणताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
'पुष्पा-2' मध्ये 'हे' बॉलिवूड कलाकार साकारणार भूमिका?
पुष्पा-2 मध्ये काही बॉलिवूडमधील कलाकार देखील काम करणार आहेत, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटात सलमान खान आणि अजय देवगण हे महत्वाची भूमिका साकारतील, असंही म्हटलं जात आहे.
पुष्पा द राइज (Pushpa: The Rise - Part 1) हा चित्रपट 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता अल्लू अर्जुनचे चाहते पुष्पाः2 म्हणजेच पुष्पा द रुल (Pushpa: The Rule) या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल, जगदीश, अजय घोष, सुनील आणि अनसूया या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटातील श्रीवल्ली,सामी सामी,ओ अंटवा या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. 'मैं झुकेगा नहीं साला', 'फ्लावर नहीं फायर है' या पुष्पा चित्रपटामधील डायलॉग्सनं तर प्रेक्षकांना वेड लावलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Pushpa 2: तुरुंगातून पुष्पा झालाय फरार; पुष्पा-2 ची घोषणा करत निर्मात्यांनी शेअर केला थरारक व्हिडीओ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)