GG Gandhada Gudi: दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं भावनिक ट्वीट
पुनीत यांचा जीजी गंधाडा गुडी (GG Gandhada Gudi) हा शेवटचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
GG Gandhada Gudi: अभिनेते पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) यांचं 29 ऑक्टोबर रोजी निधन झालं. वयाच्या 46 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुनीत यांचा जीजी गंधाडा गुडी (GG Gandhada Gudi) हा शेवटचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जीजी गंधाडा गुडी (GG Gandhada Gudi) या त्यांच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. पुनीत यांच्या पत्नी अश्विनी पुनीत राजकुमार (Ashwini Puneeth Rajkumar) यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केलं आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी एक खास ट्वीट शेअर केलं.
अश्विनी कुमार यांनी केलं ट्वीट
जीजी गंधाडा गुडी या चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन अश्विनी यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'नमस्ते नरेंद्र मोदीजी, हा दिवस आमच्यासाठी अत्यंत भावनिक आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून हा चित्रपट अप्पू यांच्या हृदयाच्या जवळचा होता. अप्पू यांना नेहमी तुमच्यासोबत बातचीत करण्यास आवडत होते. त्यामुळे मी हे तुमच्यासोबत शेअर करत आहे. ' या ट्वीटमध्ये अश्विनी यांनी नरेंद्र मोदी यांनी टॅग केलं आहे.
Namaste @narendramodi ಅವರೇ,
— Ashwini Puneeth Rajkumar (@Ashwini_PRK) October 9, 2022
Today is an emotional day for us as we are releasing the trailer of #GandhadaGudi, a project close to Appu's heart. Appu always cherished the interactions with you & would have loved to share with you in person.
Trailer link: https://t.co/36NncpkVK9 pic.twitter.com/ObdbyXTZ0M
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भावनिक ट्वीट
नरेंद्र मोदी यांनी ट्वीट शेअर करुन लिहिलं, 'अप्पू हे जगभरातील लोकांच्या हृदयावर राज्य करतात. त्यांचे व्यक्तिमत्व तेजस्वी होते. त्यांचा हा चित्रपट म्हणजे निसर्ग मातेला दिलेली भेट आहे. या चित्रपटाला माझ्या शुभेच्छा.'
Appu lives in the hearts of millions around the world. He was brilliance personified, full of energy and blessed with unparalleled talent. #GandhadaGudi is a tribute to Mother Nature, Karnataka's natural beauty and environmental conservation. My best wishes for this endeavour. https://t.co/VTimdGmDAM
— Narendra Modi (@narendramodi) October 9, 2022
Gandhada Gudi या चित्रपटाचं दिग्दर्शन अमोघवर्ष यांनी केलं आहे. हा चित्रपट 28 ऑक्टोबर रोजी कन्नड, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. तर अश्विनी पुनीत राजकुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: