एक्स्प्लोर

Puneeth Rajkumar : दिवंगत साऊथ सुपरस्टारचा सन्मान, म्हैसूर विद्यापीठाकडून पुनीत राजकुमार यांना मानद डॉक्टरेट!

Puneeth Rajkumar : पुनीत यांचे गेल्या वर्षी 29 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Puneeth Rajkumar : दिवंगत कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) यांना म्हैसूर विद्यापीठाने मानद डॉक्टरेट (मरणोत्तर) प्रदान करण्याचे जाहीर केले आहे. म्हैसूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हेमंत कुमार यांनी रविवारी ही घोषणा केली. सिनेविश्वातील त्यांच्या योगदानासाठी आणि परोपकारी कार्यासाठी त्यांना मरणोत्तर सन्मानित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या संदर्भात विद्यापीठाने पुनीत राजकुमारची पत्नी अश्विनी यांच्याशी संपर्क साधला. 22 मार्च रोजी होणाऱ्या 102व्या दीक्षांत समारंभात पुनीत यांच्या वतीने डॉक्टरेट स्वीकारण्यास त्यांच्या पत्नीने सहमती दर्शवली आहे. पुनीत यांचे गेल्या वर्षी 29 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. पुनीतचे वडील दिवंगत डॉ. राजकुमार यांनाही म्हैसूर विद्यापीठाने मानद पदवी बहाल केली होती.

म्हैसूर विद्यापीठ 22 मार्च रोजी 102वा दीक्षांत समारंभ साजरा करणार आहे. या सोहळ्यात 28,581 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. याआधी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दीक्षांत समारंभ पार पडला होता. कोरोना महामारीमुळे या कार्यक्रमाला उशीर झाला होता.

हृदयविकाराच्या झटक्याने झाले निधन

पुनीत यांचे वय अवघे 46 वर्षे होते आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. फिटनेस फ्रीक म्हणवल्या जाणाऱ्या पुनीत यांना जिममध्ये दोन तास व्यायाम केल्यानंतर छातीत दुखत असल्याची समस्या जाणवली. पुनीतची तब्येत बिघडल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले होता. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र तसे होऊ शकले नाही.

अभिनेत्याचे समाजकार्य

पुनीत म्हैसूर येथील शक्तीधाम आश्रमात त्यांच्या आईसोबत अनेकवर्ष सेवा करत होते. खऱ्या आयुष्यातही ते अगदी ‘हिरो’ होते. पुनीत जवळपास 26 अनाथाश्रम, 15 मोफत शाळा, 16 वृद्धाश्रम, 19 गोठ्यांमध्ये दानधर्म आणि मदतकार्य करत होते. कोणताही गाजावाजा न करता त्यांनी हे सर्व शांतपणे केले. मृत्यूनंतर त्यांचे डोळे दान करण्यात आले.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Mulshi Pattern Actor Om Bhutkar: गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?
गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?
Netflix Women Centric Film Webseries: या 7 महिला-केंद्रित सिनेमांनी आणि वेबसीरिजने Netflix वर घातलाय धुमाकूळ; तुम्ही पाहिल्यात?
या 7 महिला-केंद्रित सिनेमांनी आणि वेबसीरिजने Netflix वर घातलाय धुमाकूळ; तुम्ही पाहिल्यात?
Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर प्रसिद्ध भारतीय माजी क्रिकेटपटूची एन्ट्री; अभिनेता मुलगा अन् नातीची विशेष हजेरी
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर प्रसिद्ध भारतीय माजी क्रिकेटपटूची एन्ट्री; अभिनेता मुलगा अन् नातीची विशेष हजेरी
राजपाल यादव पुन्हा जाणार तुरुंगात; चेक बाऊन्स प्रकरणात उच्च न्यायालयाचा मोठा दणका
राजपाल यादव पुन्हा जाणार तुरुंगात; चेक बाऊन्स प्रकरणात उच्च न्यायालयाचा मोठा दणका

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Devendra Fadnavis : राज्यातील 'त्या' शेतकऱ्यांचं 50 हजारांऐवजी 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार, प्रोत्साहनपर अनुदानाची 2026-27चं कर्ज भरण्याची अट काढली, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
राज्यातील 'त्या' शेतकऱ्यांचं 50 हजारांऐवजी 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
Eknath Shinde on Missing Link : एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन; एकनाथ शिंदेंची टिप्पणी
एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन : एकनाथ शिंदे
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Tiger Dart: वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
Eknath Shinde : पाणी की तरह ये दोस्ती हमारी कोई भी कोई कितना भी चाहे जुदा नही होंगे, एकनाथ शिंदेंचं देवेंद्र फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर शायरीतून भाष्य
हम वो नही जो दिल तोड देंगे, थाम कर हात फिर साथ छोड देंगे, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget