एक्स्प्लोर

Priyanka Chopra : ठरलं! ‘या’ दिवशी प्रियांका चोप्रा चाहत्यांना दाखवणार लेकीचा चेहरा! मधु चोप्रांनी दिले संकेत

Priyanka Chopra : प्रियांका चोप्राच्या आईने अर्थात मधु चोप्रा यांनी प्रियांका तिच्या मुलीचा चेहरा चाहत्यांना कधी दाखवणार हे सांगितले आहे.

Priyanka Chopra : बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद लुटत आहे. ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील प्रत्येक अपडेट तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी निक (Nick Jonas) आणि प्रियांकाने आपल्या लेकीचे स्वागत केले होते. आपल्या मुलीच्या जन्माचा आनंद तिने चाहत्यांसोबत शेअर केला होता. प्रियांका नेहमी आपल्या लेकीची झलक सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र, तिने कधीच आपल्या लेकीचा चेहरा रिव्हील केला नाही. आता तिची आई मधु चोप्राने (Madhu Chopra) यांनी याविषयी एक मोठं विधान केलं.

प्रियांका चोप्राच्या आईने अर्थात मधु चोप्रा यांनी प्रियांका तिच्या मुलीचा चेहरा चाहत्यांना कधी दाखवणार हे सांगितले आहे. ‘मदर्स डे 2022’च्या निमित्ताने, प्रियांकाने तिच्या मुलीची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली होती.

पालक म्हणून कसे आहे निक आणि प्रियांका?

प्रियांकाच्या लेकीचे ‘मालती मेरी चोप्रा जोनास’ हे नाव तिच्या आईच्या मधुमालती चोप्रा उर्फ ​​मधु चोप्रा या नावावरून प्रेरित आहे. यावर बोलताना मधु चोप्रा म्हणाल्या की, ‘ही एक सुखद गोष्ट आहे. हे खास सरप्राईज त्यांना देखील बारशाच्या दिवशीचं मिळालं होतं. मधु यांनी सांगितले की, हिंदू परंपरेनुसा नामकरण समारंभातील विधी निकच्या वडिलांनी केले होते.

निक आणि प्रियांका बाळची काळजी कशी घेतात, याविषयी बोलताना मधु चोप्रा म्हणाल्या, ‘पालक म्हणून निक आणि प्रियांका खूप जबाबदार आहेत. मी मालतीला मालिश करते, तर निक तिला आंघोळ घालतो आणि तिचे डायपर बदलतो.’ यावेळी प्रियांकाच्या आईने खुलासा केला की, प्रियांका कदाचित मालती मेरीच्या पहिल्या वाढदिवसाला तिचा चेहरा चाहत्यांना दाखवेल.’

प्रियांका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

प्रियांकाची ‘सिटाडेल’ ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. प्रियांका गेले काही दिवस या सीरिजचे शूटिंग करत आहे. या सीरिजमध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील अभिनेता रिचर्ड मॅडन प्रमुख भूमिका साकारणार आहेत. ही एक सायन्स फिक्शन सीरिज आहे. तसेच, प्रियांका ही ‘जी ले जरा’या चित्रपटामधून देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार आहे.

प्रियांका चोप्रा सध्या मातृत्वाचा आनंद लुटत आहे. यावर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच जानेवारी महिन्यात प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी सरोगेसीद्वारे त्यांच्या लेकीचे स्वागत केले. प्रियांका आणि निकने त्यांच्या लेकीचे नाव ‘मालती मेरी चोप्रा जोनास’ (Malti Marie Chopra Jonas) असे ठेवले आहे. मालती आता 6 महिन्यांची झाली आहे. मात्र, अजूनही प्रियांकाने तिच्या मुलीचा चेहरा सोशल मीडियावर दाखवलेला नाही. चाहते मालतीचा चेहरा बघण्यासाठी उत्सुक आहेत.

हेही वाचा :

Priyanka Chopra : प्रियंका चोप्राने पूर्ण केली 'सिटाडेल'ची शूटिंग; देसी गर्लने व्हिडीओ केला शेअर

Priyanka Chopra, Nick Jonas : ‘मालती आणि मालतीचे बाबा’, प्रियांका चोप्राने शेअर केला निक जोनास अन् लेकीचा खास फोटो!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget