रणवीर सिंहनंतर आता प्रियांका चोप्रा अन् विराट कोहलीला जंगल फिरवणार बेयर ग्रील्स? उत्तर देताना म्हणतो...
Man Vs Wild : बेयर ग्रील्सच्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar), अजय देवगण (Ajay Devgn), विकी कौशल (Vicky Kaushal), रजनीकांत (Rajinikath) हे कलाकार देखील सहभागी झाले होते.
Bear Grylls, Priyanka Chopra : Man Vs Wild या शोच्या माध्यमातून बेयर ग्रील्सने (Bear Grylls) अनेक सेलिब्रिटींसोबत जंगल सफारी आणि साहसी राईड्स केल्या आहेत. आता बेयर ग्रील्सला आणखी एका बॉलिवूड स्टारसोबत या साहसी जंगल सफरीवर जायचे आहे. बेयर ग्रील्सच्या यादीतील ही अभिनेत्री आहे प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra). नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, जेव्हा बेयर ग्रील्सला विचारले गेले की, आता त्याला कोणत्या सेलेब्ससोबत फिरायला जायला आवडेल? तेव्हा, या प्रश्नाला उत्तर देताना त्याने क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि प्रियांका चोप्रा यांचे नाव घेतले.
बेयर ग्रील्स म्हणाला की, विराट एक अद्भुत आणि धाडसी व्यक्तिमत्त्व आहे. त्याच वेळी, प्रियांकाबद्दल बोलताना तो म्हणाला की, तिच्यासोबत राईडवर जाणे म्हणजे खूप धमाल असेल आणि या दरम्यान लोकांना तिच्याबद्दल बरेच काही जाणून घ्यायला, तसेच ऐकायला मिळेल.
‘हे’ सेलिब्रिटी झाले होते सहभागी!
बेयर ग्रील्सच्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar), अजय देवगण (Ajay Devgn), विकी कौशल (Vicky Kaushal), रजनीकांत (Rajinikath) हे कलाकार देखील सहभागी झाले होते. या खास अनुभवाबद्दल सांगताना बेयर म्हणतो, की भारतीय सेलिब्रिटींसोबत राईडवर जाणे खूप मजेशीर आहे. मुलाखतीदरम्यान तो म्हणाला की, मला भारतीय चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींसोबत हा शो करायला आवडतो. त्यांच्याकडून खूप प्रेम आणि आपुलकी मिळते. त्यांच्यासोबत राहिल्याने मलाही भारतीय असल्याचा भास होतो. भारत माझ्यासाठी नेहमीच खास राहिला आहे आणि तो नेहमीच माझ्या हृदया जवळचा देश आहे. मला भारतीय सेलिब्रिटींसोबत वेळ घालवायला आवडतो. त्यांचे जेवण आणि त्यांच्याकडून भरभरून मिळणारे प्रेम मला आवडते.
बेयर ग्रील्सकडून रणवीर सिंहचं कौतुक!
विशेष म्हणजे, बेयर ग्रील्स अलीकडेच बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहसोबत त्याचा साहसी खेळ करताना दिसला होता. रणवीरविषयी बोलताना बेयर म्हणाला की, जीवन म्हणजे ध्येय शोधणे. रणवीर सिंह डोळे उघडे ठेवून अतिशय हुशारीने आपलं आयुष्य जगतो. त्याने कायम तसंच राहावं, यासाठी मला त्याला प्रोत्साहन द्यायचे आहे. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह नुकताच बेयर ग्रील्सच्या शोमध्ये झळकला होता. या शोमधून रणवीरची एक नवी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
हेही वाचा :