![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Priyanka Chopra : लॉस एंजेलिसमध्ये मॅनहोलचं झाकण 'मेड इन इंडिया', प्रियांका चोप्राने शेअर केला फोटो
Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने लॉस एंजेलिसमधून चाहत्यांसोबत फोटो शेअर केले आहेत.
![Priyanka Chopra : लॉस एंजेलिसमध्ये मॅनहोलचं झाकण 'मेड इन इंडिया', प्रियांका चोप्राने शेअर केला फोटो Priyanka Chopra proudly poses with LA manhole cover that's Made in India her niece joins in See pic Priyanka Chopra : लॉस एंजेलिसमध्ये मॅनहोलचं झाकण 'मेड इन इंडिया', प्रियांका चोप्राने शेअर केला फोटो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/05/2b383ec43c14fc1b0a644bc3620beb53_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Priyanka Chopra : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) लॉस एंजेलिसमधून चाहत्यांच्या संपर्कात असते. प्रियांका सोशल मीडियावर तिच्या आयुष्या संबंधित अनेक गोष्टी शेअर करत असते. नुकतेच प्रियांकाने लॉस एंजेलिसमधील मॅनहोलच्या झाकणासोबतचे फोटो शेअर केले आहेत. कारण लॉस एंजेलिसमधील मॅनहोलचं झाकण हे 'मेड इन इंडिया' आहे.
प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर मॅनहोलच्या झाकणासोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत प्रियांकासोबत तिची भाची कृष्णादेखील दिसत आहे. प्रियांकाने हे फोटो शेअर करण्यामागे एक खास कारण आहे. प्रियांका आणि कृष्णा दोघीही रस्त्यावर मॅनहोलच्या झाकणासोबत फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. कारण त्या झाकणावर 'मेड इन इंडिया' असे लिहिले आहे.
View this post on Instagram
प्रियांका चोप्राने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन मैदानातील फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत प्रियांकाने लिहिले आहे, गेम डे...परफेक्ट संडे! तसेच इंस्टास्टोरीवरदेखील प्रियांकाने कृष्णासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. फोटोवर 'मेड इन इंडिया' असा हॅशटॅग वापरला आहे. प्रियांकाने बॉलिवूडसोबत हॉलिवूडमध्येदेखील ठसा उमटवला आहे.
संबंधित बातम्या
Sher Shivraj : अंगावर शहारे आणणाऱ्या 'शेर शिवराज'चे नवे पोस्टर प्रदर्शित
Shehnaaz Gill : शहनाज गिलच्या आठवणीत अजूनही सिद्धार्थ, वॉलपेपरवरही तोच...
Mere Desh Ki Dharti : देश बदल रहा है! 'मेरे देश की धरती' सिनेमाचे पोस्टर आऊट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)