Mere Desh Ki Dharti : देश बदल रहा है! 'मेरे देश की धरती' सिनेमाचे पोस्टर आऊट
Mere Desh Ki Dharti : 'मेरे देश की धरती' हा सिनेमा 6 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Mere Desh Ki Dharti : 'मेरे देश की धरती' (Mere Desh Ki Dharti) या सिनेमाचे नुकतेच एक पोस्टर आऊट झाले आहे. 6 मे ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'देश बदल रहा है' असे म्हणत या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
आत्मविश्वास आणि चैतन्याचं बेमालूम मिश्रण म्हणजे तरुणाई. आजची तरुणाई काहीतरी नवं करण्यात गुंतलेली असते. देशाच्या प्रगतीसाठी धडपडणाऱ्या दोन इंजिनिअर तरुणांची कथा 'मेरे देश की धरती' या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. नव्या कल्पनांचा शोध घेऊन दोन इंजिनिअर्स तरुण गावचा कसा कायापलट करतात हे दाखवून देणारा हा सिनेमा असणार आहे.
View this post on Instagram
शेती हा नेहमीच आपल्या देशाचा कणा राहिला आहे. दोन इंजिनिअर्स तरुण स्वत:ची नोकरी करत असताना, काहीतरी वेगळे करून दाखवण्याची उर्मी जपण्यासाठी कसे शेतकरी बनतात याची हलकी फुलकी रंजक कथा 'मेरे देश की धरती' या सिनेमातून उलगडणार आहे.
संबंधित बातम्या
Samrenu : भाजप नेत्या पंकजा मुंडेच्या हस्ते 'समरेणू'चे पोस्टर लॉंच, 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित
Ranbir-Alia Wedding : मुहूर्त ठरला! आलिया-रणबीर 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात
Salman Khan ला हायकोर्टाचा मोठा दिलासा, अंधेरी दंडाधिकारी कोर्टाच्या समन्सला 5 मेपर्यंत स्थगिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha