एक्स्प्लोर
आजीच्या 94 व्या बर्थडेला प्रियंकाकडून बालपणीचे फोटो शेअर
मुंबई : 'बेवॉच', 'क्वाँटिको' सारख्या मालिका-चित्रपटांमुळे सातासमुद्रापार कीर्ती मिळवणाऱ्या अभिनेत्री प्रियंका चोप्राने आपल्या कुटुंबीयांशी नाळ तुटली नसल्याचं दाखवून दिलं आहे. आजीच्या 94 व्या वाढदिवसानिमित्त तिने आजीसोबतचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे.
गेल्या शुक्रवारी म्हणजे 27 तारखेला प्रियंका मुंबईत परत आली. शनिवारी तिच्या आजीचा म्हणजे आईच्या आईचा 94 वा वाढदिवस होता. त्यानिमित्त पीसीने लहानपणी तिची आजी आणि वडिल अशोक चोप्रांसोबत काढलेला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
या फोटोमध्ये तिघांचेही चेहरे गंभीर दिसत आहेत, यावरुनच तिने कॅप्शनही दिलं आहे. 'आजी 94 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्या बर्थडेसाठी मी घरी आल्ये, याचा खूप आनंद झालाय. हा जुना फोटो मला सापडला. कोणास ठाऊक आम्ही सगळे यात त्रासिक का दिसतोय. मला वाटतं आईने जबरदस्ती आम्हाला हा फोटो काढायला भाग पाडलं होतं.'
प्रियंका काही काळासाठी मायदेशी परतली आहे. मात्र हा दौरा आरामासाठी नसून पुढील 40 दिवसांत ती एक-दोन नव्हे तर तब्बल 100 कोटी रुपये कमावणार असल्याची माहिती आहे. 100 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये जाणारे चित्रपट बॉलिवूडसाठी नवीन नाहीत. मात्र प्रियंका 100 कोटी कमावणारी पहिली सेलिब्रेटी ठरु शकते. प्रियंकाने 24 अॅड कॅम्पेन साईन केल्या असून दीड महिन्यात ती 100 कोटी कमवू शकते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement