एक्स्प्लोर

Priyanka Chopra : 'मला वाळीत टाकलं...'; प्रियांकानं शेअर केले बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये जातानाचे अनुभव

Priyanka Chopra : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकतचं एका मुलाखतीत बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये काम करत असताना आलेल्या अनुभवांवर भाष्य केलं आहे.

Priyanka Chopra On Working In Hollywood : बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राची  (Priyanka Chopra) लोकप्रियता जगभरात आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने स्वत:ला सिद्ध केलं आहे. हॉलिवूडमध्येदेखील तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. नुकतचं एका मुलाखतीत तिने बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये काम करत असताना आलेल्या अनुभवांवर भाष्य केलं आहे. 

प्रियांका चोप्राचा 'सिटाडेल' (Citadel) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या प्रियांका या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत तिने बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये जातानाचे अनुभव शेअर केले आहेत प्रियांका म्हणाली,"बॉलिवूडमध्ये चांगलं काम केल्यानंतरही मला वाळीत टाकलं जात होतं". 

प्रियांका चोप्रा काय म्हणाली?

प्रियांका पुढे म्हणाली,"बॉलिवूडमध्ये चांगलं काम केल्यानंतरही मला वाळीत टाकलं जात होतं. काम मिळत नव्हते. बॉलिवूडमधील राजकारणाचा मला कंटाळा आला होता. त्यामुळे मी काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान मी अनेक हॉलिवूड सिनेमे पाहिले आणि पुन्हा कमबॅक करताना हॉलिवूडचा सिनेमा करण्याचा निर्णय घेतला". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

हॉलिवूडमध्ये काम कसं मिळालं याबद्दल बोलताना प्रियांका म्हणाली,"देसी हिट्सच्या अंजुला आचार्य यांनी माझा एक व्हिडीओ पाहिला होता. माझं काम त्यांच्या पसंतीस उतरलं आणि त्यांनी मला हॉलिवूड सिनेमासाठी विचारणा केली. त्यामुळे मला बॉलिवूड सिनेमांसाठी विचारणा होत नसल्याने मी लगेचच अंजुला यांना होकार दिला". 

हॉलिवूडमध्ये देसी गर्लचा बोलबाला

हॉलिवूडमध्ये 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राचा चांगलाच दबदबा आहे. तिने पिटबुल, विल.आई.एम, फैरेल विलिय्मस सारख्या हॉलिवूडच्या अनेक कलाकारांसोबत काम केलं आहे. आतापर्यंत हॉलिवूडच्या अनेक सिनेमांत प्रियांकाने काम केलं आहे. आता लवकरच ती 'सिटाडेल' आणि 'लव्ह अगेन'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रियांकाचे आगामी प्रोजेक्ट (Priyanka Chopra Upcoming Movies)

प्रियांका सध्या 'सिटाडेल' या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या वेबसीरिजची निर्मिती 236 मिलियन डॉलरमध्ये करण्यात आली आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये 28 एप्रिलपासून ही सीरिज प्रेक्षक प्राइम व्हिडीओवर पाहू शकतात. तसेच तिचा 'लव्ह अगेन' हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या सिनेमातदेखील ती झळकणार आहे.

संबंधित बातम्या

Priyanka Chopra On SRK: 'हॉलिवूडमध्ये काम करणार नाही', शाहरुखच्या वक्तव्यावर प्रियांकाची प्रतिक्रिया; म्हणाली, 'बोरिंग...'

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Bayangi Palaychi Nahi Talaychi movie: नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget