Priyanka Chopra Citadel : प्रियांकाच्या 'सिटाडेल'चा नवा रेकॉर्ड; लोकप्रिय वेबसीरिजच्या यादीत ठरली 'नंबर वन'
Priyanka Chopra : प्रियांका चोप्राची 'सिटाडेल' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
Priyanka Chopra Citadel Web Series : बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या चर्चेत आहे. तिची 'सिटाडेल' (Citadel) ही सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अल्पावधीतच ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या सीरिजने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत.
'सिटाडेल' ही वेबसीरिज जगभरातील लोकप्रिय वेबसीरिजच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या वेबसीरिजला 1125 रेटिंग मिळाले आहेत. तर दुसऱ्या स्थानावर नेटफ्लिक्सची 'स्वीट टूथ' ही सीरिज आहे. या वेबसीरिजला 669 रेटिंग मिळाले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर 'The Marvelous Mrs Maisel' आहे. याला 623 रेटिंग मिळाले आहे. चौथ्या क्रमांकावर 'The Diplomat' आहे. याला 572 रेटिंग मिळाले आहे. तर पाचव्या क्रमांकावर 'पावर' आहे. याला 533 रेटिंग मिळाले. आहे.
प्रियांकाच्या 'सिटाडेल'चं सर्वत्र कौतुक (Priyanka Chopra Citadel Web Series)
प्रियांका चोप्राची (Priyanka Chopra) 'सिटाडेल' (Citadel) ही सीरिज 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. डेविल वेल आणि रुसो ब्रदर्सने या सीरिजची निर्मिती केली आहे. या सीरिजमध्ये प्रियांका हॉलिवूड अभिनेता रिचर्ड मॅडनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली आहे. या सीरिजमधील प्रियांकाच्या अभिनयाचं आणि अॅक्शन सीनचं खूप कौतुक आहे.
'सिटाडेल' या वेबसीरिजमधील प्रियांकाचा अॅक्शन मोड प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ही सीरिज प्रेक्षक प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. थरार-नाट्य असणाऱ्या या वेबसीरिजचं आणि प्रियांकाच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. या सीरिजच्या प्रमोशनसाठी प्रियांका खास भारतात आली होती. 'सिटाडेल' या वेब सीरिजची निर्मिती 236 मिलियन डॉलरमध्ये करण्यात आली आहे. ही सीरिज भारतीय प्रेक्षक हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये पाहू शकतात.
प्रियांकाचे आगामी सिनेमे (Priyanka Chopra Upcoming Movie)
अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येदेखील स्वत:ला सिद्ध केलं आहे. 'सिटाडेल' नंतर प्रियांका 'जी ले जरा' (Jee Le Zaraa) या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात ती आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि कतरिना कैफसोबत (Katrina Kaif) स्क्रीन शेअर करताना दिसेल. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची झलकदेखील पाहायला मिळणार असल्याचा अंदाज आहे. फरहान अख्तरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
संबंधित बातम्या