एक्स्प्लोर

Priyanka Chopra: प्रियांका चोप्रा अॅक्शन मोडमध्ये; म्हणाली, 'सिटाडेलमधील स्टंट मी स्वत: केले...'

सिटाडेल सीरिजमध्ये प्रियांका चोप्रा खतरनाक स्टंट सीन्स करताना दिसणार आहे, ज्याची झलक या सीरिजच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे.

Priyanka Chopra:  बॉलिवूडची देसी गर्ल अशी ओळख असणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)  ही सध्या तिच्या  'सिटाडेल' (Citadel)  या आगामी सीरिजचे प्रमोशन करत आहे. प्रियांका तिच्या हॉलिवूड प्रोजक्ट्समुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सिटाडेल सीरिजमध्ये प्रियांका चोप्रा खतरनाक स्टंट सीन्स करताना दिसणार आहे, ज्याची झलक या सीरिजच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे. आता प्रियांका चोप्राने सांगितले की, सीरिजमधील  अनेक स्टंट तिने स्वतः केले आहेत.

एका मुलाखतीदरम्यान प्रियंकाने सिटाडेल या वेब सीरिजमधील तिच्या अॅक्शन सीन्सबद्दल सांगितले. ती म्हणाली, 'मी अॅक्शन फिल्म्सच्या बॅकग्राऊंडमधून आली आहे. मी बॉलिवूडमध्येही अनेक अॅक्शन चित्रपट केले आहेत. सिटाडेलची स्टंट टीम म्हणजे रुसो ब्रदर्स  हे त्यांच्या कामात मास्टर आहेत. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. मी अहंकारी नाही. मी कधीच विचार करत नाही की मी इतके चित्रपट केले आहेत, त्यामुळे मला सर्व काही माहित आहे, परंतु मला शिकायला आवडते. विशेषत: जेव्हा एखाद्याला माझ्यापेक्षा जास्त अनुभव असतो.   तेव्हा त्याच्याकडून मी शिकत असते.

प्रियांका पुढे म्हणाली, ' सिटाडेल या वेब सीरिजमधील जवळपास 80 टक्के स्टंट मी स्वतः केले आहेत, कारण मला माझ्या शरीरावर आणि माझ्या ज्ञानावर माझा विश्वास होता, पण मी खूप काही शिकले आहे आणि या शोमध्ये मी जे अॅक्शन सीन्स केले आहेत, ते खूप वेगळी आहे. जे मी यापूर्वी कधीही केले नव्हते.'

सिटाडेल कधी होणार रिलीज?

प्रियांकाची सिटाडेल ही सीरिज 28 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'सिटाडेल' ही सीरिज जगभरातील 240 हून अधिक देशांमध्ये स्ट्रीम केली जाणार आहे. 'सिटाडेल' या वेब सीरिजची निर्मिती 236 मिलियन डॉलरमध्ये करण्यात आली आहे, असं म्हटलं जात आहे. ही सीरिज भारतातील लोक हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये पाहू शकणार आहेत. प्रियांकाच्या या सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

प्रियांकाच्या आगामी चित्रपटांची तिचे चाहते उत्सुकतेने वाट बघतात. प्रियांका ही ‘जी ले जरा’या चित्रपटामधून देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार आहे. तसेच कतरिना कॅफ आणि आलिया भट या अभिनेत्री या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 

 इतर महत्वाच्या बातम्या: 

Priyanka Chopra:  देसी गर्ल आणि WWE सुपरस्टार एकत्र करणार काम; प्रियांका आणि जॉन सीना यांचा ‘हेड्स ऑफ स्टेट’ चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Embed widget