Sarsenapati Hambirrao : 'परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट'; प्रविण तरडेंच्या ‘सरसेनापती हंबीरराव’चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
Sarsenapati Hambirrao : ‘सरसेनापती हंबीरराव’ या सिनेमाचा लवकरच वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे.
Sarsenapati Hambirrao World Television Premiere : ‘महाराजांचं स्वराज्य अठरा पगड जातीजमातींनी मिळून उभं केलं.. हिंदवी स्वराज्यासाठी जो मरणासमोर हटून उभा राहिला तो मरहट्टा.. वीर मराठा..’ अशी गर्जना ऐकून आली आणि प्रेक्षकांमध्ये ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao) या ऐतिहासिक सिनेमाची उत्सुकता निर्माण झाली. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर (World Television Premiere) होणार आहे.
‘सरसेनापती हंबीरराव’ या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची धुरा प्रविण तरडेंनी (Pravin Tarde) सांभाळली आहे. या सिनेमात अभिनेता गश्मीर महाजनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. तर प्रविण तरडेंनी सरसेनापती हंबीररावांची भूमिका साकारली आहे.
View this post on Instagram
‘सरसेनापती हंबीरराव’ आता घरबसल्या पाहा...
‘सरसेनापती हंबीरराव’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांनादेखील मागे टाकलं होतं. सरसेनापतींचा इतिहास जाणून घेण्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात सिनेमागृहात गर्दी करताना दिसून आले होते. पण आता हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. प्रवाह पिक्चरवर प्रेक्षक हा सिनेमा 20 नोव्हेंबरला रविवारी दुपारी 1 वाजता पाहू शकतात.
सिनेमागृहांबाहेर झळकला हाऊसफुल्लचा बोर्ड!
‘सरसेनापती हंबीरराव’ हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला तेव्हा मुंबई, ठाणे, पुणे, मराठवाडा, विदर्भ, सांगली, नाशिक, कोल्हापूरातील सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड झळकला होता. हा प्रेक्षक पाहण्यासाठी प्रेक्षक सहकुटुंब सिनेमागृहांत जात होते.
सरसेनापती हंबीरराव
कुठे पाहू शकता? 20 नोव्हेंबर
किती वाजता? दुपारी 1 वाजता
संबंधित बातम्या