Prasad Oak : नव्या वर्षात प्रसाद ओकची मोठी घोषणा; 'धर्मवीर'नंतर आता साकारणार प्रभाकर पणशीकरांची भूमिका
Prasad Oak : अभिनेता प्रसाद ओकचा 'तोच मी प्रभाकर पणशीकर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Prasad Oak On Toch Mi Prabhakar Panshikar : अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांत त्याचे अनेक सिनेमे गाजले आहेत आता त्याचा 'तोच मी प्रभाकर पणशीकर' (Toch Mi Prabhakar Panshikar) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीला प्रसादने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. नवं वर्षाच्या सुरुवातीला प्रसादने 'तोच मी प्रभाकर पणशीकर' या सिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा अभिजीत देशपांडे सांभाळणार आहेत.
श्री गणेश मार्केटिंग आणि फिल्मसच्या बॅनरअंतर्गत 'तोच मी प्रभाकर पणशीकर' या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यानंतर आता प्रभाकर पणशीकर यांचं आयुष्य रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
View this post on Instagram
प्रसादने 'तोच मी प्रभाकर पणशीकर' या सिनेमाचं एक पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरवर "आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर'नंतर मराठी रंगभूमीच्या सोनेरी इतिहासातलं पुढचं पर्व", असं लिहिण्यात आलं आहे. पोस्टर शेअर करत प्रसादने लिहिलं आहे,"नवं वर्ष...नवं स्वप्न... सोबत जुनेच मित्र कलावंत.... आणि आशीर्वाद देणारे आहेत पंत."
स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधव, मंजिरी ओक, अमृता खानविलकर अशा मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी प्रसादच्या पोस्टवर कमेंट करत त्याला नव्या सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसरीकडे चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
'तोच मी प्रभाकर पणशीकर' या सिनेमात प्रसाद ओकसह आणखी कोण कलाकार झळकणार हे अद्याप समोर आलेलं नाही. या सिनेमाची रिलीज डेटदेखील अजून जाहीर केलेली नाही. पण या बायोपिकची चाहत्यांना, नाट्यरसिकांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या