एक्स्प्लोर
Advertisement
दिलदार प्रभास, तामिळनाडूच्या शेतकऱ्यांना 75 लाखांची मदत
दाक्षिणात्य अभिनेता कार्थीने खाकी चित्रपटाच्या प्रमोशनवेळी प्रभासच्या दानशूरतेविषयी माहिती दिली.
मुंबई : बाहुबली चित्रपटात अमरेंद्र आणि महेंद्र बाहुबली यांचा दिलदारपणा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. मात्र ही व्यक्तिरेखा साकारणारा सुपरस्टार प्रभास प्रत्यक्षातही तितकाच विशाल हृदयी असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रभासने तामिळनाडूतील शेतकऱ्यांना तब्बल 75 लाख रुपयांची मदत केल्याची माहिती आहे.
दाक्षिणात्य अभिनेता कार्थीने खाकी चित्रपटाच्या प्रमोशनवेळी प्रभासच्या दानशूरतेविषयी माहिती दिली. वादळाचा तडाखा बसलेल्या तामिळनाडूतील कडलुरु जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रभासने 75 लाख रुपयांची मदत केल्याचं कार्तीने सांगितलं. प्रभासने आपल्या दातृत्वाविषयी मौन बाळगणं पसंत केलं होतं.
कार्थीने किंग नागार्जुन आणि 'बाहुबली' फेम तमन्ना भाटियासोबत उपिरी चित्रपटात भूमिका केली आहे.
प्रभास सध्या 'साहो' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर आणि नील नितीन मुकेश झळकणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बीड
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement