South Superstars : प्रभास ते अल्लू अर्जुन, रजनीकांत ते कमल हासनपर्यंत; 'या' सहा दाक्षिणात्य सुपरस्टार्सचं मानधन ऐकूण व्हाल अवाक्
South Superstars : प्रभास (Prabhas), अल्लू अर्जुन (Allu Arjun), रजनीकांत (Rajinikanth) आणि कमल हासन (Kamal Haasan) या दाक्षिणात्य कलाकारांची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. या कलाकारांचं मानधनदेखील तगडं आहे.
South Superstars : दाक्षिणात्य चित्रपटांचा (South Movies) बोलबाला फक्त बॉलिवूड (Bollywood) नव्हे हॉलिवूडमध्येही (Hollywood) पाहायला मिळतो. जागतिक पातळीवरही दाक्षिणात्य चित्रपट चांगलं परफॉर्म करतात. जगभरात दाक्षिणात्य कलाकारांचा मोठा चाहतावर्ग आहे. अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि प्रभाससारख्या (Prabhas) कलाकारांचे चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होतात तेव्हा बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पडतो. निर्मात्यांसह दाक्षिणात्य सुपरस्टार्सदेखील बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत असतात.
एखाद्या चित्रपटासाठी 100 कोटी मानधन घेणं ही दाक्षिणात्य कलाकारांसाठी सर्वसाधारण बाब आहे. या कलाकारांच्या मानधनमध्ये एखाद्या बॉलिवूडच्या चित्रपटाची निर्मिती होऊ शकते. नितेश तिवारी यांच्या रामायण चित्रपटासाठी यशने 150 कोटी रुपये चार्ज केले आहेत. रामायण तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाच्या प्रत्येक भागासाठी यशने 50 कोटी रुपये आकारले आहेत. जाणून घ्या दाक्षिणात्य कलाकारांच्या मानधनाबद्दल...
प्रभास (Prabhas) : प्रभास सध्या 'कल्कि एडी' या चित्रपटाचा भाग असल्याने चर्चेत आहे. या चित्रपटासाठी त्याने 150 कोटी रुपये चार्ज केले आहेत. तर 'सालार'साठी त्याने 100 कोटी रुपयांचं मानधन घेतलं होतं. बाहुबली स्टारसाठी 100 कोटी रुपये ही सर्वसाधारण बाब आहे.
अल्लू अर्जुन (Allu Arjun) : 'पुष्पा'च्या शानदार यशानंतर चाहते आता 'पुष्पा 2'ची प्रतीक्षा करत आहेत. पुष्पाच्या यशानंतर अल्लू अर्जुनने आपल्या मानधनात वाढ केली आहे. एका रिपोर्टनुसार, 'पुष्पा : द रुल'साठी अल्लू अर्जुनने 125 कोटी रुपये चार्ज केले आहेत.
रजनीकांत (Rajinikanth) : मेगास्टार रजनीकांत गेल्या काही दशकांपासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. रजनीकांतच्या चित्रपटाची चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता असते. जेलर या चित्रपटासाठी रजनीकांतने 110 कोटी रुपये आकारले आहेत.
कमल हासन (Kamal Haasan) : दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन खलनायकाच्या भूमिकेसाठी खूपच लोकप्रिय आहे. कमल हासनकडे अनेक चित्रपट पाईपलाईनमध्ये आहेत. कमल हासनने आपल्या आगामी 'इंडियन 2' या चित्रपटासाठी 150 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. या चित्रपटाची चाहते अनेक वर्षांपासून वाट पाहत आहेत.
विजय (Vijay) : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय चांगलं मानधन घेण्यात अग्रेसर आहे. विजयने 'लिओ' चित्रपटासाठी 120 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. 300 कोटी रुपयांत या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.
राम चरण (Ram Charan) : तगडं मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये राम चरणचा समावेश आहे. आरआरआरच्या यशानंतर राम चरणने आपल्या मानधनात वाढ केली आहे. राम चरणने आपल्या 'गेम चेंजर' या चित्रपटासाठी 100 कोटी रुपये चार्ज केले आहेत.
संबंधित बातम्या