एक्स्प्लोर

OTT Release This Weekend:  ड्रामा, सस्पेन्स थ्रिलर ते अॅक्शनपटाची मेजवानी, ओटीटीवर या वीकेंडला काय पाहाल?

OTT Release This Weekend:   हा वीकेंड प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. या आठवड्यात ओटीटीवर वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट, सीरिज रिलीज झाले आहेत.

OTT Release This Weekend:  हा वीकेंड प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. या आठवड्यात ओटीटीवर वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट, सीरिज रिलीज झाले आहेत. यापैकी काही वेब सीरिज, चित्रपट आधीच OTT वर रिलीज झाले आहेत. रोमान्स, अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा अशा वेगवेगळ्या  धाटणीच्या प्रेक्षकांना चित्रपट, वेब सीरिज पाहता येणार आहेत. 

>> या आठवड्यात काय पाहाल?

> गुल्लक 4 Gullak 4 Web Series 

सुपरहिट वेब सीरिज गुल्लकचा चौथा सीझन रिलीज होणार आहे. मिश्राजींचा धाकटा मुलगा अमन याच्या भोवती वेब सीरिजचे कथानक असणार आहे. अमन आता वयात येत असून पौगंडावस्थेत त्याच्यात होणारे बदल दिसणार आहेत.तर,  मिश्राजींचा मोठा मुलगा आता घराचा भार स्वत: च्या खांद्यावर घेणार आहे. गुल्लकच्या आधीच्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 

कोणत्या ओटीटीवर कधी होणार रिलीज? 

'गुल्लक' वेब सीरिज ही सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 7 जून रोजी रिलीज होणार आहे. 

>'बडे मियाँ छोटे मियाँ' Bade Miyan Chote Miyan

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांची मुख्य असलेला 'बडे मियाँ छोटे मियाँ'हा अॅक्शनपट  आता ओटीटीवर रिलीज होत आहे. हा चित्रपट 10 एप्रिल 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता.  त्यानंतर ओटीटीवर रिलीज होत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सरासरी कमाई केली होती. 

कोणत्या ओटीटीवर कधी होणार रिलीज? 

हा चित्रपट 6 जून रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीज झाला आहे. 

> हिट मॅन (Hit Man)

हिट मॅन ही एक अॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे. ग्लेन पॉवेल हा न्यू ऑरलियन्स कॉलेजमधील प्राध्यापक गॅरी जॉन्सनच्या भूमिकेत आहे. 

कोणत्या ओटीटीवर कधी होणार रिलीज? 

हा चित्रपट 7 जून रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार  आहे. 

> ब्लॅक आउट 

अभिनेता विक्रम मेस्सी याचा 'ब्लॅक आउट'  हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. विक्रांत मेस्सी सोबत मौनी रॉय, सुनील ग्रोव्हरची या चित्रपटात भूमिका आहे. हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. एका रात्री घडत असलेल्या घटनाक्रमांवर हा चित्रपट आहे. पत्रकार असलेला विक्रांत मेस्सी हा  एका रात्री वीज गेल्याने पत्नीसाठी जेवण आणायला बाहेर जातो. त्यावेळी एकामागोमाग एक घटना घडत जात आहे. 

कोणत्या ओटीटीवर कधी होणार रिलीज? 

'ब्लॅक आउट'  हा चित्रपट जिओ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.

> द लिजेंड ऑफ हनुमान-सीझन 4  The Legend Of Hanuman Season 4 

सलग तीन हिट सीझननंतर, आता 'द लिजेंड ऑफ हनुमान'चा चौथा सीझन रिलीज झाला आहे. चाहते या सीझनची उत्सुकतेने वाट पाहत होते. अभिनेता शरद केळकरने या सीरिजमध्ये रावणाच्या पात्राला आवाज दिला आहे. या सीझनमध्ये कुंभकर्णाची एन्ट्री झाली आहे. अॅनिमेशन, इफेक्टस  प्रभावी झाले आहेत. 

कोणत्या ओटीटीवर  रिलीज? 

'द लिजेंड ऑफ हनुमान-सीझन 4' ही वेब सीरिज 4 जून रोजी 'डिस्ने प्लस हॉट स्टार'वर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. 

> 105  मिनिट्स

'105 मिनिट्स' हा एक तेलगू भाषेतील हॉरर थ्रिलर चित्रपट आहे. राजू दुस्सा यांनी दिग्दर्शन केले असून बोम्मक शिवा यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटात या  चित्रपटात हंसिका मोटवानीची मुख्य भूमिका आहे. 

कोणत्या ओटीटीवर  रिलीज? 

हा चित्रपट तुम्ही  Aha Telugu या ओटीटीवर पाहू शकता.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
Embed widget