First Second Chance : 'फर्स्ट सेकंड चांस' सिनेमाचे पोस्टर आऊट, रेणुका शहाणे रोमॅंटिक भूमिकेत
First Second Chance : 'फर्स्ट सेकंड चांस' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

First Second Chance Poster Release : 'फर्स्ट सेकंड चांस' (First Second Chance) या सिनेमाचे पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या सिनेमात 'हम आपके हैं कौन' फेम रेणुका शहाणे रोमॅंटिक अंदाजात दिसणार आहेत. रेणुका शहाणे आणि अनंद महादेवन या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमाचे पोस्टर चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
'फर्स्ट सेकंड चांस' सिनेमाच्या पोस्टरमधून हा सिनेमा प्रेक्षकांना जुन्या आठवणींना उजाळा करून देईल याचा अंदाज येतो. या सिनेमात बिग बॉस फेम देवोलीन भट्टाचार्जी तसेच साहिल उप्पल आणि निखिल संघदेखील दिसून येणार आहेत. या सिनेमातील गाणी आनंद भास्कर आणि हंसिका अय्यर यांनी गायली आहेत.
View this post on Instagram
'फर्स्ट सेकंड चांस' सिनेमाचे दिग्दर्शन लक्ष्मी आर अय्यरने केले आहे. हा सिनेमा अनेक गोष्टीवर भाष्य करणारा आहे. या सिनेमाच्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. आता प्रेक्षक या सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. रेणुका शहाणेला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्याची चाहते प्रतीक्षा करत आहेत.
संबंधित बातम्या























