एक्स्प्लोर
लग्नानंतर असिनचा बॉलिवूडला रामराम?
मुंबई : 'गजनी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली दाक्षिणात्य अभिनेत्री असिन चित्रपटसृष्टीला रामराम करण्याचे संकेत आहेत. राहुल शर्मासोबत विवाहबंधनात अडकल्यानंतर आपण एकही व्यावसायिक काम स्वीकारलं नसल्याची घोषणा असिनने केली.
लग्नानंतर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींच्या करिअरला उतरती कळा लागल्याला बॉलिवूड साक्षीदार आहे. सध्याच्या घडीला करिना कपूर, विद्या बालन, काजोल यांचे अपवाद असले तरी करिश्मा कपूर, राणी मुखर्जी, ऐश्वर्या राय बच्चन, रविना टंडन यासारख्या अनेक प्रसिद्धीच्या शिखरावरील अभिनेत्री लग्नानंतर फारशी चमक दाखवू शकल्या नाहीत. त्यामुळे असिनने वेळीच निवृत्ती घेतल्याची शंका उपस्थित केली जात आहे.
एकीकडे लग्न किंवा बाळंतपणानंतर कमबॅक करणाऱ्या अभिनेत्रींना प्रेक्षकांचा तितकासा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे असिनच्या अनपेक्षित संन्यासामुळे चाहते खट्टू झाले आहेत. अर्थात हा पूर्णविराम आहे की स्वल्पविराम याबाबत असिनने कोणतेही संकेत दिलेले नाहीत. मात्र असिन लवकरच पुनरागमन करेल, अशी आशा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
लग्नापूर्वीही असिनने याबाबत घोषणा केली होती. मात्र तिला पुन्हा पुन्हा विचारणा करणाऱ्यांना इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून असिनने स्पष्टीकरण दिले आहे. जानेवारी महिन्यात असिन मायक्रोमॅक्सचा को-फाऊण्डर राहुल शर्मासोबत विवाहबंधनात अडकली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement