एक्स्प्लोर

Pooja Hegde : पूजा हेगडेला जीवे मारण्याची धमकी? अभिनेत्रीच्या टीमने दिलं स्पष्टीकरण

Pooja Hegde : लोकप्रिय अभिनेत्री पूजा हेगडेला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. तिच्या टीमने याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

Pooja Hegde : दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीसह बॉलिवूड गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री पूजा हेगडेला (Pooja Hegde) जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अभिनेत्रीच्या टीमने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. पूजाला धमकी मिळाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. दुबईतील एका क्लबच्या उद्धाटनादरम्यान अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी मिळाली.

नेमकं प्रकरण काय?

मीडिया रिपोर्टनुसार, पूजा हेगडे एका क्लबच्या उद्धाटनासाठी दुबईला गेली होती. त्यावेळी तिथे एका व्यक्तीसोबत पूजाचे वाद झाले आणि त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची बातमी समोर आली होती. अनेक पत्रकारांनी पूजाला धमकी मिळाल्याच्या बातम्या केल्या. या बातम्या सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल झाल्या. चाहतेही चिंता व्यक्त करू लागले. पूजाच्या टीमने आता या खोट्या बातमीचं खंडण केलं आहे. 

पूजा हेगडेच्या टीमने फ्री प्रेस जर्नलसोबत बोलताना म्हटलं आहे की,"पूजा हेगडेला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची बातमी कशी व्हायरल झाली हे आम्हाला माहिती नाही. ही खोटी बातमी आहे. तिला कोणीही जीवे मारण्याची धमकी दिलेली नाही". अभिनेत्रीने अद्याप या प्रकरणावर काहीही भाष्य केलेलं नाही.

पूजाच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Pooja Hegde Upcoming Movies)

पूजा हेगडेचा 'किसी का भाई किसी का जान' (Kisi Ka Bhai Kisi Ka Jaan) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात वेंकटेश दग्गुबाती, शहनाज गिल, राघव गुयाल, पलक तिवारी, जस्सी गिल, सिद्धार्थ निगम, विनाली भटनागर आणि विजेंदर सिंह महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. आता शाहिद कपूरच्या आगामी अॅक्शन थ्रिलर सिनेमात पूजा झळकणार आहे. पूजाचा 'देवा' हा आगामी सिनेमा आहे. 11 ऑक्टोबर 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पूजाचा 'हाऊसफुल 5' हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमात पूजासह अक्षय कुमार, अर्शद वारसी, रितेश देशमुख, जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन, बॉबी देओल, दिशा पटानी आणि रविना टंडनही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

पूजा अभिनेत्री असण्यासोबत मॉडेलही आहे. हिंदीसह अनेक तामिळ आणि तेलुगू सिनेमांत तिने काम केलं आहे. 'मिस युनिव्हर्स इंडिया 2010' या स्पर्धेची ती उपविजेती होती. 'मुगामूदी' या साऊथ सिनेमाच्या माध्यमातून तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये पूजाचा समावेश होतो. पूजा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे.

संबंधित बातम्या

Pooja Hegde Troll: इफ्तार पार्टीसाठी पूजा हेगडेनं केलेल्या लूकला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'ही डान्स पार्टी नाही...'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
'Shaky Shaky'नं धुमाकूळ घातला, आता 'Bangles'नं वेड लावलं; संजू राठोडचं नवं कोरं गाणं रिलीज, ट्रेंडी गाणं ऐकाच
'Shaky Shaky'नं धुमाकूळ घातला, आता 'Bangles'नं वेड लावलं; संजू राठोडचं नवं कोरं गाणं रिलीज, ट्रेंडी गाणं ऐकाच
प्रोटेक्शन यूज करना मत भूलना...; अजय देवगणसोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीला आईचा बोल्ड सल्ला, अजून काय म्हणाली?
प्रोटेक्शन यूज करना मत भूलना...; अजय देवगणसोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीला आईचा बोल्ड सल्ला, अजून काय म्हणाली?
Gulshan kumar Brother Darshan Kumar: मनोरंजनविश्वावर शोककळा! T - Seriesचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या धाकट्या भावाचे निधन, मृत्यूचं कारण अस्पष्ट
मनोरंजनविश्वावर शोककळा! T - Seriesचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या धाकट्या भावाचे निधन, मृत्यूचं कारण अस्पष्ट

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ameet Satam BMC Fund: बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Bigg Boss Marathi 6 Tanvi Kolte: सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
Local Train Accident Dombivli: मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Ahilyanagar Crime News: 'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
Bhendwal Bhavishyvani 2026: जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
Embed widget