Ponniyin Selvan 2 Box Office Collection: 'पोन्नियिन सेल्वन 2' चा बॉक्स ऑफिसवर जलवा; दुसऱ्या दिवशी केली एवढी कमाई
'पोन्नियिन सेल्वन 2' (Ponniyin Selvan 2) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.
Ponniyin Selvan 2 Box Office Collection Day 2: 'पोन्नियिन सेल्वन 1' (Ponniyin Selvan-1) या ऐतिहासिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्याचप्रमाणे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 'पोन्नियिन सेल्वन 2' (Ponniyin Selvan 2) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेला 'पोन्नियिन सेल्वन' या चित्रपटाला रिलीज होऊन दोन दिवस झाले आहेत. दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन जाणून घेऊयात...
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) स्टारर चित्रपट 'पोन्नियिन सेलवन 2' या चित्रपटातील सेट, चित्रपटाचे कथानक आणि कलाकारांचा अभिनय या सर्वांनाच प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली. 28 एप्रिल 2023 रोजी रिलीज झाला. या चित्रपटानं पहिल्या दिवशी 32 कोटींची कमाई केली. वीकेंडला हा चित्रपट चांगली कमाई करेल, असा अंदाज लावला जात होता. एका रिपोर्टनुसार, शनिवारी म्हणजेच 29 एप्रिल रोजी चित्रपटानं 24 कोटींची कमाई केली. चित्रपटाचे एग्जेक्ट कलेक्शन यापेक्षा कमी किंवा जास्त असू शकते.
पोन्नियिन सेल्वन 2 ची स्टार कास्ट
'पोन्नियिन सेल्वन 2' या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन, चियान विक्रम, कार्ती, त्रिशा, जयम रवी, ऐश्वर्या लक्ष्मी आणि शोभिता धुलिपाला, आर सरथकुमार, प्रभू, विक्रम प्रभू, जयराम, प्रकाश राज, पार्थिवन, रहमान, लाल, जयचित्रा आणि नस्सर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत रिलीज झाला आहे.पोन्नियिन सेल्वन हा सिनेमा कल्कि यांच्या तमिळ कादंबरीवर आधारित आहे.
View this post on Instagram
पोन्नियिन सेल्वन हा सिनेमा कल्कि यांच्या तमिळ कादंबरीवर आधारित असणार आहे. ही कादंबरी 1995 साली काल्कि यांनी लिहिली आहे. ऐश्वर्या राय बच्चन पोन्नियिन सेल्वनमध्ये राणी नंदिनीची भूमिका साकारली आहे.
गेल्या वर्षी 30 सप्टेंबर रोजी पोन्नियन सेल्वन या चित्रपटाचा पहिला भाग हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज झाला.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Ponniyin Selvan 2 Review : भव्यदिव्य 'पोन्नियिन सेल्वन 2'! कथानकात पडला मागे