(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बहिणीच्या वादग्रस्त ट्विटनंतर कंगनाचा आक्षेपार्ह व्हिडीओ; मुंबईत तक्रार दाखल
बहीण रंगोली चंदेल हिच्या समर्थनार्थ जारी केलेल्या एका व्हिडीओमुळे कंगना रनौत वादात सापडली आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने आपली बहीण आणि मॅनेजर रंगोली चंदेल हिच्या वादग्रस्त ट्विटच्या समर्थनार्थ एक व्हिडीओ जारी केला होता. या व्हिडीओमध्ये 'आक्षेपार्ह' भाषेचा वापर कंगनाने केला होता. या विरोधात मुंबईतील आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय. वकील अली काशिफ खान यांनी कंगना विरोधात ही तक्रार दाखली केली आहे.
वकील अली काशिफ खान यांनी एबीपी न्यूजशी फोनवर बोलताना सांगितले, की कंगनाने आपल्या बहिणी रांगोलीच्या बचावासाठी एक व्हिडिओ तयार केला होता. ज्यात खूपच आक्षेपार्ह भाषा वापरली असून विशिष्ट समुदायाला लक्ष्य केलं आहे. या विशिष्ट समुदायासाठी तिने दहशतवादी शब्दाचा वापर केला आहे. या व्हिडीओमधून जाणूनबुजून अशी वक्तव्य केल्याचा आरोप अली ते अली काशिफ खान म्हणाले. वकील अली काशिफ खान यांनी आपल्या लेखी तक्रारीत कंगना रनौत यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम 153 ए 153 बी, 295 ए, 298 नुसार कारवाईची मागणी केली आहे.
रंगोलीचं वादग्रस्त ट्विट काही दिवासांपूर्वी उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद शहरातील एका वस्तीमध्ये कोरोना विषाणूची चाचणी घेण्यासाठी आलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर लोकांनी दगडफेक केल्याचा प्रकार घडला होता. या हल्ल्यात अनेक आरोग्य कर्मचारी जखमी झाले. या घटनेनंतर कंगनाची बहिणी आणि व्यवस्थापक गंगोली हिने अत्यंत आक्षेपार्ह ट्विट करत विशिष्ट समाजाला लक्ष्य केलं होतं. या हल्लेखोर लोकांना तिने 'दहशतवादी' संबोधले होते. यावरचं न थांबता अशा हल्लेखोरांना गोळ्या घालण्याची भाषा केली होती. रंगोली हिच्या या ट्विटमुळे वातावरण खूपचं तापलं. त्यामुळे ट्विटरने तिचं अकाउंट सस्पेंड केलं.
रंगोलीचं कंगनाकडून समर्थन रंगालीच्या या वादग्रस्त ट्विटनंतर कंगनाने बहिणीच्या समर्थनार्थ एक व्हिडीओ जारी केला. ज्यात तिने रंगोलीच्या सर्व वक्तव्यांचं समर्थन केलं. या व्हिडीओमुळे आता कंगनाही अडचणीत आली आहे. विशेष म्हणजे मागच्याच आठवड्यात वकील अली काशिफ खान यांनी रंगोली हिच्या विरोधात आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.