Swati Mishra: कोण आहे स्वाती मिश्रा? जिचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील केलं कौतुक
Swati Mishra: स्वाती मिश्रा (Swati Mishra) हिचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी केलं आहे. जाणून घेऊयात गायिका स्वाती मिश्राबद्दल...
Swati Mishra: 22 जानेवारीला अयोध्येत (Ayodhya) राम मंदिरच्या (Ram Mandir) उद्घाटनाचा भव्य कार्यक्रम होणार आहे. राम मंदिरच्या उद्घाटनाला अनेकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. अशताच सोशल मीडियावर रामचे एक भजन व्हायरल होत आहे. "राम आएंगे", असं या भजनाचं नाव आहे. या भजनाची गायिका स्वाती मिश्रा (Swati Mishra) हिचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी केलं आहे. जाणून घेऊयात गायिका स्वाती मिश्राबद्दल...
स्वाती मिश्राचं नरेंद्र मोदींनी केलं कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर (X) एक ट्वीट शेअर करुन स्वातीचे आणि "राम आएंगे" या गाण्याचं कौतुक केलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले ,"श्री रामलल्ला यांच्या स्वागतासाठी स्वाती मिश्रा यांनी गायलेले हे भजन मंत्रमुग्ध करणारे आहे..."."राम आएंगे" हे मंत्रमुग्ध करणारे भजन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी या भजनावर रील बनवत आहेत. या भजनाची युट्यूब लिंक देखील नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर शेअर केली आहे.
श्री राम लला के स्वागत में स्वाति मिश्रा जी का भक्ति से भरा यह भजन मंत्रमुग्ध करने वाला है…#ShriRamBhajanhttps://t.co/g2u1RhPpqO
— Narendra Modi (@narendramodi) January 3, 2024
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, अश्विनी कुमार चौबे, यूपीचे सीए योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह अनेकांनी या भजनाच्या थीमवर बनवलेला व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आहे.
जाणून घ्या स्वाती मिश्राबद्दल...
स्वाती मिश्रा ही बिहारमधील माला गावची आहे. ती सध्या मुंबईमध्ये राहते. स्वाती मिश्राला गायनाची आवड आहे. स्वातीच्या 'राम आएंगे तो अंगना सजाऊंगी...' या भजनाला सोशल मीडियावर 44 मिलियन्सहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. स्वाती मिश्राचे YouTube वर तीन चॅनल आहेत आणि सर्व चॅनेलवर लाखो सबस्क्रायबर्स आहेत. राम आए हैं (Ram Aaye Hain) या स्वातीच्या गाण्याला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. स्वाती इन्स्टाग्रामवर तिच्या नव्या गाण्यांची माहिती नेटकऱ्यांना देत असते.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Ayodhya Ram Mandir: अयोध्येत पोहोचली कंगना रनौत; रामलल्लाचे घेतले दर्शन, फोटो शेअर करत म्हणाली...