Pathan Box Office Collection Day 2: केजीएफ 2 अन् बाहुबली 2 लाही टाकलं मागे; दुसऱ्या दिवशी पठाणची छप्पर फाड कमाई
Pathan Box Office Collection Day 2: पठाण (Pathaan) चित्रपटानं 'ओपनिंग डे'ला जबरदस्त कमाई केली. आता दुसऱ्या दिवशी देखील या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
Pathan Box Office Collection Day 2: पठाण (Pathan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. या चित्रपटात बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणारा शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. पठाण चित्रपटानं ओपनिंग डेला जबरदस्त कमाई केली. आता दुसऱ्या दिवशी देखील या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं दोन दिवसांचे कलेक्शन...
26 जानेवारीला प्रजासत्ताकनिमित्त असणाऱ्या सुट्टीचा फायदा पठाणला झाला. पठाण चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं दुसऱ्या दिवशी म्हणजेच, 26 जानेवारीला जवळपास 65 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर पहिल्या दिवशी या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं 55 कोटी कमावले होते. दोन दिवसांमध्ये या चित्रपटानं 120 कोटींची कमाई केली आहे.
केजीएफ 2 अन् बाहुबली 2 लाही टाकलं मागे
'पठाण'ने 2 दिवसांच्या कमाई बाबतीत 'केजीएफ 2' (K.G.F: Chapter 2) आणि 'बाहुबली 2' (Baahubali 2) या दोन चित्रपटांना मागे टाकले आहे. केजीएफ-2 (हिंदी) ने दोन दिवसांत 100.74 कोटी रुपये कमावले होते. तर बाहुबली 2 ने दोन दिवसांत 81.5 कोटी रुपये कमवले होते.
250 कोटींच्या बजेटमध्ये झाली चित्रपटाची निर्मिती
सिद्धार्थ आनंदनं पठाण या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 250 कोटींच्या बजेटमध्ये पठाणची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटात शाहरुखनं रॉ एजंटची भूमिका साकारली आहे.
पठाण हा चित्रपट वर्ल्ड वाइड 8 हजार स्क्रीन्स वर प्रदर्शित झाला. नंतर 300 स्क्रीन्स वाढवण्यात आल्या, असं म्हटलं जात आहेत. पठाण या चित्रपटातील झुमे जो पठाण आणि बेशरम रंग या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटात शाहरुख आणि दीपिका पादुकोण सोबतच जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली.
पठाण या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले आहे. भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झाले आहे.
पठाणनंतर शाहरुख जवान (Jawan) आणि डंकी (dunki) या आगामी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गेल्या वर्षी राजकुमार हिरानी आणि शाहरुख खान यांनी एका व्हिडीओच्या माध्यामातून डंकी या चित्रपटाची घोषणा केली होती. शाहरुखच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
महत्वाच्या इतर बातम्या:
Pathaan Housefull: पठाणची काश्मिरमध्ये जादू; तब्बल 32 वर्षांनी थिएटरबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड