Pathaan Housefull: पठाणची काश्मिरमध्ये जादू; तब्बल 32 वर्षांनी थिएटरबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड
Pathaan Housefull: पठाण चित्रपटामुळे आता काश्मिर खोऱ्यातील (Kashmir Valley) एका थिएटरबाहेर तब्बल 32 वर्षांनी हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे.
Pathaan Housefull: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा पठाण (Pathaan) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या माध्यामातून शाहरुख खाननं चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. पठाण हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी शाहरुखच्या चाहत्यांनी या चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग केलं. काही चाहत्यांनी तर अख्खं थिएटर बुक केलं होतं. आता पठाणच्या कामगिरींच्या यादीत आणखी एका कामगिरीचा सामवेश झाला आहे. पठाण चित्रपटामुळे आता काश्मिर खोऱ्यातील (Kashmir Valley) एका थिएटरबाहेर तब्बल 32 वर्षांनी हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे.
काश्मीर खोऱ्यातील थिएटरबाहेर 32 वर्षांनंतर 'हाऊसफुल' बोर्ड लागला. मल्टिप्लेक्स चेन INOX Leisure Ltd ही माहिती दिली आहे. आयनॉक्सच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्वीट शेअर करुन काश्मिर खोऱ्यातील थिएटर हाऊसफुल्ल झाल्याची माहिती देण्यात आली आहे. '32 वर्षांनंतर काश्मीर खोऱ्यातील थिएटरमध्ये हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे. आम्ही किंग खानचे आभारी आहोत! धन्यवाद', असं या ट्वीटमध्ये लिहिण्यात आलं आहे.
Today, with #Pathaan frenzy gripping the nation, we are grateful to KING KHAN for bringing the treasured #HOUSEFULL sign back to the Kashmir Valley after 32 long years! Thank you #ShahRukhKhan𓀠 @iamsrk @thejohnabraham @deepikapadukone @YRF @PathaanTheFilm #YRF50 pic.twitter.com/bkOvyjMrOh
— INOX Leisure Ltd. (@INOXMovies) January 26, 2023
पठाणनं रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी जगभरातील बॉक्स ऑफिसवर जवळपास 100 कोटींची कमाई केली आहे. भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झाले आहे. पठाण शाहरुखनं या चित्रपटात एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे.
पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. या चित्रपटातील झुमे जो पठाण आणि बेशरम रंग या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटात शाहरुख आणि दीपिका पादुकोण सोबतच जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली.
पठाणनंतर शाहरुख हा जवान आणि डंकी या आगामी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गेल्या वर्षी राजकुमार हिरानी आणि शाहरुख खान यांनी एका व्हिडीओच्या माध्यामातून डंकी या चित्रपटाची घोषणा केली होती तर शाहरुखनं जवान चित्रपटातील त्याचा लूक देखील रिलीज केला होता.
महत्वाच्या इतर बातम्या:
Pathaan Box Office Collection Day 1: 'पठाण'ची बॉक्स ऑफिसवर हवा! पहिल्या दिवशी कमावले एवढे कोटी