एक्स्प्लोर

Pathaan : शाहरुख खानच्या 'पठाण'चा जगभर डंका; लवकरच 900 कोटींचा आकडा पार करणार?

Pathaan Worldwide Collection : सुपरस्टार शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाने कमाईच्या बाबतीत आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे.

Pathaan Worldwide Collection : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) लोकप्रिय चित्रपट 'पठाण' (Pathaan) चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. पठाण चित्रपट रिलीज होऊन 17 दिवस झाले आहेत आणि रिलीजच्या 17 व्या दिवसांत हा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. कमाईच्या बाबतीत 'पठाण'ने बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वच चित्रपटांना मागे टाकले आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या स्पाय थ्रिलर 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. विशेष म्हणजे तिसऱ्या वीकेंडला 'पठाण' चित्रपटाची नजर जगभरातील 900 कोटींच्या कलेक्शनवर असणार आहे.

'पठाण'ने आतापर्यंत जगभरात 'इतकी' कमाई केली 

'पठाण' हा चित्रपट जगभरात कमाई करण्यात यशस्वी झाला आहे. 'पठाण'च्या जगभरातील कलेक्शनवर नजर टाकली तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. रिलीजच्या जवळपास तीन आठवड्यात सुपरस्टार शाहरुख खानच्या या चित्रपटाने कमाई अक्षरश: रेकॉर्डब्रेक आहे. आतापर्यंत जगभरात इतकी कमाई करणारा 'पठाण' हा चित्रपट आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, 'पठाण'ने रिलीजच्या 17 दिवसांत जगभरात 888 कोटींचे बंपर कलेक्शन केलं आहे. याबरोबरच 'पठाण'ची चर्चा जगभरातही मोठ्या प्रमाणावर होतेय. 'पठाण' या चित्रपटाने परदेशात 337 कोटींचा गल्ला जमवला आहे. अशा परिस्थितीत तिसऱ्या वीकेंडला 'पठाण' चित्रपट जगभरात 900 कोटींच्या घरात पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. 'पठाण' ज्या पद्धतीने कमाई करत आहे, त्यावरून शनिवारी 900 कोटींचा आकडा पार करेल, असा अंदाज लावण्यात येतोय. 

बॉक्स ऑफिसवरही दमदार 'पठाण'

शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली आहे. 'पठाण'ने कलेक्शनच्या बाबतीत 'दंगल' आणि 'वॉर' सारखे मोठे ब्लॉकबस्टर हिंदी चित्रपट मागे टाकले आहेत. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या मते, 'पठाण'ने रिलीजच्या 17 दिवसांत सर्व भाषांमध्ये बॉक्स ऑफिसवर 464 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

शाहरुखच्या अॅक्शन लूकने चाहत्यांना घातली भुरळ 

शाहरुख खानने पठाण चित्रपटात रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. यामध्ये त्याची अॅक्शन आणि खतरनाक स्टंट सीक्वेन्स पाहून चाहते फार खुश झाले. खलनायकाच्या भूमिकेत जॉन अब्राहमने देखील चाहत्यांची मनं जिंकली. 'पठाण'मध्ये आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

'पठाण' मध्ये तगडी स्टार कास्ट 

पठाण चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पादुकोण (Deepika Padukone), जॉन अब्राहम (John Abraham), आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात अभिनेता सलमान खाननं देखील कॅमिओ केला आहे. शाहरुखनं पठाण चित्रपटात एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील शाहरुख आणि दीपिकाच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

Selfiee : 'हे पात्र माझ्या आयुष्याशी जोडलेलं आहे'; 'सेल्फी'च्या BTS व्हिडीओमध्ये अक्षय कुमारने सांगितला 'तो' किस्सा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावाUddhav Thackeray vs Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंची टीका, देवेंद्र फडवीसांचा पलटवारMaharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 18 May 2024Suhas Palshikar Majha Katta:युती की मविआ, राज्याची हवा कुणाच्याबाजूने? पळशीकरांचं विश्लेषण 'कट्टा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
Embed widget