(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Selfiee : 'हे पात्र माझ्या आयुष्याशी जोडलेलं आहे'; 'सेल्फी'च्या BTS व्हिडीओमध्ये अक्षय कुमारने सांगितला 'तो' किस्सा
Akshay Kumar On Selfiee : अभिनेता अक्षय कुमार आगामी 'सेल्फी' चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान, 'सेल्फी'च्या BTS व्हिडीओमध्ये अक्षयने चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल बरंच काही सांगितलं आहे.
Akshay Kumar On Selfiee : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला (Akshay Kumar) वेगळ्या कोणत्याच ओळखीची गरज नाही. जबरदस्त कॉमेडी सेन्स असलेला अॅक्शन हिरो अक्षय कुमार त्याच्या कूल स्टाईलमुळेही प्रसिद्ध आहे. चाहतेही अक्षयच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. येत्या काळात अक्षय कुमार दिग्दर्शक राज मेहता यांच्या 'सेल्फी' (Selfiee) या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान, 'सेल्फी'चा एक BTS व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय चित्रपटाच्या शूटिंगचे धमाल किस्से आणि चित्रपटाचा एकंदरीत अनुभव कसा होता याविषयी सांगतोय.
'सेल्फी'च्या व्यक्तिरेखेबद्दल अक्षय म्हणाला...
हा व्हिडीओ अक्षय कुमारने आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो सेल्फी चित्रपटा दरम्यानचे किस्से सांगतोय. सेल्फी चित्रपटातील आपली भूमिका आणि काम करण्याचा अनुभव याविषयी अक्षय बोलतोय. अक्षय म्हणाला, "सेल्फी'मधील विजय कुमारचे पात्र माझ्या वैयक्तिक आयुष्याशी फार मिळतं-जुळतं आहे. तुम्हाला ट्रेलर पाहून अंदाज आलाच असेल. एखादा अभिनेता त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक (प्रोफेशनल) आयुष्यात कसा काम करतो आणि आपल्या कुटुंबियांना सांभाळून घेतो. हे तुम्हाला विजय कुमारच्या भूमिकेत दिसेल."
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये 'सेल्फी' चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता देखील अक्षय आणि विजयकुमार यांच्या भूमिकांची तुलना करतायत. तर, या व्हिडीओमध्ये अक्षयने इम्रान हाशमीबरोबर काम करण्याचाही अनुभव सांगितला आहे. अक्षय म्हणाला, 'मी पहिल्यांदा इम्रानबरोबर काम करतोय. तो ऑन आणि ऑफ स्क्रीनही सारखाच आहे.'
कॉमेडी ड्रामा आहे 'सेल्फी'
‘सेल्फी’ हा राज मेहता दिग्दर्शित कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात अक्षय कुमार एका सुपरस्टारच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, इम्रान हाश्मी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे, जो अक्षय कुमारचा खूप मोठा चाहता असणार आहे. अक्षय आणि इम्रानसोबत या चित्रपटात नुसरत भरुचा आणि डायना पेंटी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात नुसरत भरुचा इम्रानच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.
'या' दिवशी प्रदर्शित होतोय सेल्फी
अक्षय कुमारसाठी 2022 हे वर्ष फारसं काही खास गेलं नाही. त्यामुळे आता अक्षयला 'सेल्फी' चित्रपटाकडून खूप आशा आहेत. अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मी यांची मुख्य भूमिका असलेला 'सेल्फी' चित्रपट येत्या 24 फेब्रुवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :