एक्स्प्लोर

Pathaan : शाहरुख-दीपिका नव्हे तर 'हे' आहेत 'पठाण'चे खरे चेहरे; फोटो व्हायरल

Pathaan : 'पठाण' सिनेमाच्या सेटवरचा एक फोटो सध्या व्हायरल होत असून यात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण बॉडी डबल्ससह पोज देताना दिसत आहेत.

Pathaan BTS Photo : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. लवकरच हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणने एकाहून एक स्टंट आणि अॅक्शन सीक्वेन्स करताना दिसून आले आहेत. पण हे सीन्स करण्यासाठी दोघांनाही बॉडी डबलचा वापर केला आहे. सध्या 'पठाण' सिनेमाच्या सेटवरचा एक फोटो सध्या व्हायरल होत असून यात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण बॉडी डबल्ससह पोज देताना दिसत आहेत.

'पठाण' ओटीटीवर होणार रिलीज! 

'पठाण' हा सिनेमा 22 मार्च रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ (Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. पठाण हा चित्रपट रिलीज होऊन 56 दिवस झाले आहेत. आता 56 दिवसांनंतर हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.

शाहरुख खानचा अॅक्शन मोड, सिनेमातील गाणी, संवाद प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. शाहरुखसह या सिनेमात दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'पठाण' या सिनेमावर रिलीजआधी मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. पण वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. 

बॉक्स ऑफिसवर 'पठाण'चा बोलबाला

'पठाण' या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. सिनेमावर टीका झाल्यानंतर शाहरुखने या सिनेमाचं प्रमोशनदेखील केलं नाही. पण तरीही लाडक्या सेलिब्रिटीचा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांची पाऊले सिनेमागृहाकडे वळाली. चांगलं कथानक, उत्तम दिग्दर्शक, सिनेमाची योग्य बांधणी आणि उत्कृष्ट कलाकार असतील तर तो सिनेमा यशस्वी होतोच. 

'पठाण'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन... (Pathaan Box Office Collection)

रिलीजच्या 50 दिवसांनंतरही 800 सिनेमागृहांत प्रदर्शित होणारा शाहरुखचा 'पठाण' हा पहिलाच हिंदी सिनेमा आहे. आतापर्यंत या सिनेमाने भारतात 521 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 1043 कोटींचा गल्ला जमवला आहे. आता शाहरुख खानचा 'जवान' आणि 'डंकी' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. 

संबंधित बातम्या

Pathaan: प्रतीक्षा संपली! शाहरुखचा 'पठाण' घरबसल्या पाहता येणार; कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? जाणून घ्या...

महत्त्वाच्या बातम्या

Adinath Kothare Ramayana: 'रामायण'च्या शूटिंगदरम्यान आदिनाथ कोठारेला आला खास अनुभव, नेमकं काय घडलं? सांगितला सेटवरील किस्सा
'रामायण'च्या शूटिंगदरम्यान आदिनाथ कोठारेला आला खास अनुभव, नेमकं काय घडलं? सांगितला सेटवरील किस्सा
Mahesh Limaye On Salman Khan: 'सलमान खान T-Shirt खात सिनेमा बघत होते'; प्रवीण तरडेंचा 'मुळशी पॅटर्न' पाहिल्यानंतर भाईजानची पहिली प्रतिक्रिया काय होती?
'सलमान खान T-Shirt खात सिनेमा बघत होते'; प्रवीण तरडेंचा 'मुळशी पॅटर्न' पाहिल्यानंतर भाईजानची पहिली प्रतिक्रिया काय होती?
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना जीवे मारण्याची धमकी; गोल्डी ढिल्लनची सोशल मीडियावर पोस्ट, म्हणाला, केबिनमध्येच मारणार...
अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना जीवे मारण्याची धमकी; गोल्डी ढिल्लनची सोशल मीडियावर पोस्ट, म्हणाला, केबिनमध्येच मारणार...
Suraj Chavans Daughter Name: सूरज चव्हाणनं आपल्या लेकीचं नाव काय ठेवलं? हटक्या नावाची सोशल मीडियात चर्चा, संजनाच्या मुलीचं इन्स्टाग्राम अकाऊंटही व्हायरल
सूरज चव्हाणनं आपल्या लेकीचं नाव काय ठेवलं? हटक्या नावाची सोशल मीडियात चर्चा, संजनाच्या मुलीचं इन्स्टाग्राम अकाऊंटही व्हायरल

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
Embed widget