Pathaan: "लोकांच्या ताटात अन्न नाही, तरी कोणीतरी परिधान केलेल्या कपड्यांबद्दल संताप व्यक्त करतायत'; पठाण वादावर रत्ना पाठक शाह यांची प्रतिक्रिया
दीपिकाचं (Deepika Padukon) बेशरम रंग (Besharam Rang) हे गाणं सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. यावर आता अभिनेत्री रत्ना पाठक शाह (Ratna Pathak Shah) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Pathaan: अभिनेत्री रत्ना पाठक शाह (Ratna Pathak Shah) या वेगवेगळ्या विषयांवरील त्यांची मते मांडत असतात. लवकरच रत्ना पाठक शाह यांचा कच्छ एक्सप्रेस (Besharam Rang) हा गुजराती चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधून रत्ना या गुजराती चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. इंडियन एक्सप्रेसला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये रत्ना पाठक शाह यांनी पठाण (Pathaan) या चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) गाण्याच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या रत्ना पाठक शाह?
गेल्या काही दिवसांपासून पठाण या चित्रपटातील बेशरम रंग हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. या गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणनं घातलेल्या बिकिनीच्या रंगावर अनेकांनी आक्षेप घेतला. आता या सर्व वादावर अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या, 'लोकांच्या ताटात अन्न नसते परंतु कोणीतरी परिधान केलेल्या कपड्यांबद्दल संताप व्यक्त ते करतात.'
जेव्हा एखाद्या व्यक्तीचं वक्तव्य तसेच व्यक्तीनं परिधान केलेल्या कपड्यांच्या रंग हा राष्ट्रीय विषय बनतो तेव्हा कलाकार म्हणून काय वाटते? असे विचारल्यानंतर रत्ना पाठक म्हणाल्या, 'मी असे म्हणेन की, मूर्ख लोक असणाऱ्या काळात आपण जगत आहोत. पण मला आशा आहे की समजूतदार लोक भारतात आहेत. ही भीती, बहिष्काराची भावना टिकणारी नाहीये. मला असे वाटते की माणसांमध्ये द्वेष टिकवू शकत नाही.'
रत्ना पाठक शाह यांचा कच्छ एक्सप्रेस हा चित्रपट 6 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. विरल शहा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून या चित्रपटात रत्ना पाठक यांच्यासोबत मानसी पारेख, धर्मेंद्र गोहिल, दर्शील सफारी आणि विराफ पटेल यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
पठाण हा चित्रपट 8 देशांमध्ये शूट झाला आहे. भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तानमध्ये याचे चित्रीकरण झाले आहे. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाती वाट शाहरुख आणि दीपिकाचे चाहते उत्सुकतेने बघत आहेत. 250 कोटींच्या बजेटमध्ये 'पठाण' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: