एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Pathaan Advance Booking : शाहरुखचा 'पठाण' भारतात करणार रेकॉर्डब्रेक कमाई; काही मिनिटांत 50,000 तिकीटांची विक्री

Pathaan : शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला भारतात सुरुवात झाली आहे.

Pathaan Advance Booking : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) आगामी 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा रिलीजआधीच ब्लॉकबस्टर ठरला आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाला अॅडव्हान्स बुकिंगमध्ये जादू दाखवण्यात यश आलं आहे. भारतात या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून काही तासांत या सिनेमाच्या 40 हजार तिकीटांची विक्री झाली आहे. 

'पठाण' हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडचा बादशाह चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. त्यामुळे 'पठाण'च्या 'फर्स्ट डे फर्स्ट शो'ची चाहत्यांना उत्सुकता आहे. रिलीजआधीच या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. 

बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, 'पठाण' सिनेमाची  काही मिनिटांत 50,000 तिकीटांची विक्री झाली आहे. त्यामुळे आता रिलीजच्या पहिल्या दिवशी हा सिनेमा नक्की किती कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भारतात 20 जानेवारीपासून या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. एकीकडे 'पठाण'ला विरोध होत आहे. तर दुसरीकडे चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. पीवीआरचे (PVR) 75,000 आयनोक्सचे (INOX) 60,500 आणि सिनेपोलिसच्या (Cinepolis) 35,500 तिकीटांची विक्री झाली आहे. अशाप्रकारे आतापर्यंत या सिनेमाच्या एकूण 1,71,500 तिकीटांची विक्री झाली आहे. 

'पठाण' हा सिनेमा रिलीजआधीच 15 कोटींची कमाई करू शकतो असं म्हटलं जात आहे. या सिनेमातील 'झुमे जो पठाण' आणि 'बेशरम रंग' ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'पठाण' सिनेमात शाहरुख खानसह दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहमदेखील (John Abraham) मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. शाहरुख आणि दीपिकाला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

पठाण सिनेमाची गाणी आणि ट्रेलर आल्यानंतर या चित्रपटाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं होतं. शिवाय या चित्रपटाचा विरोध देखील काही संघटनांनी केला आहे.

संबंधित बातम्या

Pathaan Ticket Booking : रिलीजआधीच 'पठाण'ची हवा; 19 जानेवारीपर्यंत तब्बल एवढ्या तिकीटांचं अॅडव्हान्स बुकिंग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 26 November 2024Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Embed widget