Parineeti-Raghav Wedding : परिणीती-राघवच्या संगीत कार्यक्रमातील पहिला फोटो समोर; थोड्याच वेळात अडकणार लग्नबंधनात
Parineeti Raghav Wedding : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या संगीत कार्यक्रमातील पहिला फोटो आता समोर आला आहे.
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Sangeet Ceremony First Photo : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) आज लग्नबंधनात अडकणार आहेत. पंजाबी रितीरिवाजानुसार त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. आता संगीत कार्यक्रमातील त्यांचा पहिला फोटो समोर आला आहे.
पंजाबी गायक नवराज हंस यांनी परिणीती-राघव यांच्या संगीत सोहळ्यात आपल्या सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. नवराजने आता या संगीत कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये परिणीती आणि राघव खूप सुंदर दिसत आहेत.
संगीत कार्यक्रमासाठी परिणीती-राघवचा खास लूक
संगीत कार्यक्रमासाठी परिणीतीने चकमदार लेहेंगा परिधान केला होता. तर राघवचा लूकदेखील खूप खास होता. संगीत कार्यक्रमासाठी अभिनेत्रीने डिझायनर सिल्व्हर शिमरी लेहेंगा परिधान केला होता. त्यावर अभिनेत्रीने मॅचिंग ज्वेलरी आणि बांगड्या घातल्या होत्या. तर राघव चड्ढाचा लूकही खूप खास होता.
View this post on Instagram
परिणीती चोप्राच्या हातावर राघव चड्ढाच्या नावाची मेहंदी काढलेली आहे. परिणीतीने लग्नासाठी अतिशय साधी मेहंदी काढली आहे. परीच्या हातावर राघव चड्ढाच्या नावाची मेहंदी काढलेली आहे. परिणीती-राघव यांच्या संगीत कार्यक्रमातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गायक हंस मंचावर सादरीकरण करत आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मात्र थिरकताना दिसत आहेत.
परिणीती आणि राघव आज (24 सप्टेंबर) दुपारी चार वाजता लग्नबंधनात अडकणार आहेत. या शाही विवाहसोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बॉलिवूडसह राजकीय क्षेत्रातील मंडळी या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्यात 'नो फोन पॉलिसी'चा अवलंब करण्यात आला आहे. पण तरीदेखील नवराज हंसने परिणीती-राघव यांच्या लग्नसोहळ्यातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. पण आता त्याने हा फोटो हटवला आहे. परिणीती आणि राघव त्यांच्या लग्नसोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
परिणीती-राघव यांच्या लग्नात पाहुण्यांच्या यादीपासून ते संपूर्ण तयारीसाठी 100 खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या लग्नसोहळ्यात नो फोन पॉलिसीचा अवलंब करण्यात आला आहे. या लग्नसोहळ्यात पाहुण्यांना पंजाबी तसेच राजस्थानी पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.
संबंधित बातम्या